Thursday, May 2, 2024
HomeनाशिकVideo : पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी

Video : पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी

नाशिक | प्रतिनिधी Nandgaon

पालकमंत्री छगन भुजबळ हे नांदगाव शहरात झालेल्या ढगफुटीनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज आले होते. यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. अनेकांनी यावेळी आपत्कालीन निधी घोषित करण्याची मागणी केली. याच वेळी नागरिकांचा रोष व्यक्त होत असतानाच नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनीही भुजबळांवर तोंडसुख घेतले. यावेळी राष्ट्रवादी आणि सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दरम्यान, भुजबळ बैठक आटोपून निघाल्यानंतर दोन्हीही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना दूर सारले. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या