Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिककरांनो सावधान! यापुढे १० ते ४ वाजेपर्यंतच सुरु राहणार किरणा आणि भाजीपाला

नाशिककरांनो सावधान! यापुढे १० ते ४ वाजेपर्यंतच सुरु राहणार किरणा आणि भाजीपाला

नाशिक | प्रतिनिधी

करोना प्रादुर्भाव व संक्रमण रोकण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावेत म्हणुन शहरात महापालिकेने जाहीर केलेल्या भाजीबाजार आजपासुन सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यतच चालु राहणार आहे. यासंदर्भातील आदेश आज महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले आहेत. किरणा तसेच इतर अत्यावाश्यक सेवांही पुढील दोन दिवस वरील वेळेतच सुरु ठेवावेत असे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

आजच्या नवीन आदेशानुसार महापालिकेने ठरवून दिलेल्या भाजीबाजाराच्या ठिकाणी आता केवळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यतच अशाप्रकारे सहा तासच विक्रेत्याला भाजीपाला विकता येणार आहे. भाजी विक्रेते यावेळेस व्यतिरीक्त भाजीपाला विकत असल्यास त्यांचा माल अतिक्रमण विभागाकडुन तात्काळ जप्त केला जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा वाढत असुन शहरात होम कोरंटाईनचा आकडा मोठा आहे. यात नाशिक शहरातील रुग्णांची संख्या तीन झाल्याने तीन भागात प्रतिबंधक क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यादृष्टीने महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली असुन आयुक्तांनी भाजी विक्रेते यांच्यासाठी आचारसंहिता लागु केली आहे.

भाजी बाजारात विक्रेत्यांनी दोन दुकानातील अंतर 5 मीटर इतके ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विक्रेता व ग्राहक यांच्यात 1 मीटर अंतर राहील अशी व्यवस्था करणे बंधनकारक आहे. विक्रेत्यांना मास्क लावणे व हॅण्डग्लोज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विक्रेत्यांनी भाजीपाला हा पॅकेजींग किंवा बास्केट मध्ये विक्रीला प्राधान्य द्यावेत. विर्के्रते आणि ग्राहकांनी डिजीटल पेमेंटच्या माध्यमातून क्यआर कोड किंवा पेटीएमचा वापर करावा. तसेच नागरिकांनी देखील आठवडा भर पुरेल इतका भाजीपाला नेल्यास भाजी हाताळणे कमी होणार आहे.

असे असतांना शहरात भरणारे भाजीे बाजार, किराणा, मेडीकल दुकानात सामाजिक अंतर न ठेवता नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आज आदेश काढला आहे.

‘या’ अत्यावश्यक सेवा मात्र सुरु

वैद्यकीय आस्थापना व अत्यावश्यक सेवा यांना या आदेशातून वगळण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निर्गमित केलेय आदेशानुसार देण्यात आले आहेत. आदेश मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या