खूशखबर : स्पर्धा परिक्षांसाठी मोफत अभ्यासिकेची सुविधा

0

नाशिक, ता. ११ : आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधील केंद्रशासन, राज्य शासन, अंगीकृत व्यवसाय व महामंडळे यांमध्ये नोकरी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातूनच प्राप्त होत आहेत. यासाठी तयारी करणायां उमेदवारांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. या स्पर्धा परिक्षा देणाया उमेदवारांना स्पर्धा परिक्षेच्या तयारी करता आवश्यक पुस्तके व इतर स्पर्धा परिक्षेशी संबंधीत साहित्य सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे.

तसेच, स्पर्धा परिक्षेचा पुर्व तयारी एकाग्रतेने करण्यासाठी संदर्भ साहित्यासह अभ्यासाकरीता सुसज्ज अभ्यासिकेची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचे कार्यालयात विनामुल्य करिअर ग्रंथालय व अभ्यासिका सुरुवात करण्यात आली आहे.

सदर अभ्यासिकेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरीता १००० पुस्तके, तसेच, मासिके व वर्तमानपत्रे अभ्यासासाठी विनामुल्य उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक पात्रता परिक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, लिपिकटंकलेखक, आयबीपीएस, एस बी आय बँक भरती, आरोग्य सेवक भरती, इत्यादी विविध स्पर्धा परिक्षांच्या तयारीकरीता पुस्तके व मासिके व वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत.

याचप्रमाणे, स्वतचा उद्योगव्यवसाय करू इच्छिणायांसाठी याबाबतची सखोल व शास्त्रीय ज्ञान व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विविध स्वयंरोजगार संधी मार्गदर्शनाकरीताही अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.

स्पर्धा परिक्षेच्या अभ्यास करण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक हे कार्यालय नव्याने स्थलांतरीत केलेल्या जुना मुंबईआग्रा रोड, सिबिएस जवळ या ठिकाणी सुसज्ज करिअर ग्रंथालय व अभ्यासिकेची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या अभ्यासिका व ग्रंथालयाची वेळ शासकीय कामकामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यत राहील. अभ्यासिकेत सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सांयकाशी ६ वाजेपर्यंत असे  ४-४ तासाचे दोन सत्रामध्ये प्रवेशासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जागा उपलब्ध असेपर्यंत प्रथम येणारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

सदर अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी गरजु व इच्छुक उमेदवारांनी आपले आधारकार्ड व इतर ओळखपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जुने केंद्रिय कार्यालय इमारत, पहिला मजला, जुना मुंबई-आग्रा रोड, सिबिएस जवळ, नाशिक या कार्यालयात प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन संपत चाटे, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*