Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वृक्षलागवड अभियानाला हरताळ; लागवडीसाठी आणलेली झाडे महिन्यापासून समाजमंदिरात कुलूपबंद

Share

सिन्नरमधील फुलेनगरचा प्रकार; जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

नाशिक | प्रतिनिधी

राज्य शासनाच्या 3 कोटी वृक्षलागवड अभियानाला हरताळ फासण्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील फुलेनगर येथे उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीला उद्दिष्टापोटी वनविभागाने वितरित केलेली झाडे लागवड न करता महिनाभरापासून गावातील समाजमंदिरात बंद कुलुपात ठेवण्यात आली असल्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकऱ्यांना दिले आहेत.

फुलेनगर ग्रामपंचायतने उपलब्ध झाडे लागवड न करता अडगळीत टाकून दिली असून पाण्याअभावी ही झाडे कोमेजून गेली आहेत. हा प्रकार लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी या झाडांचे चित्रीकरण करून थेट जिल्हा परिषद गाठली.

शासनाच्या योजनेलाच हरताळ फासण्याचा हा प्रकार असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकरणी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश एस. भुवनेश्वरी यांनी सिन्नरच्या गटविकास अधिकऱ्यांना दिले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!