Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

‘व्हॉट्सअँप’आधी ‘गुगल पे’मध्ये येणार हे फिचर

Share

मुंबई | वृत्तसंस्था 

अल्पशा काळात भारतात ‘गुगल पे’ने चांगलीच पसंती मिळवली आहे. गुगल पे नेहमीच क्रशकार्डच्या माध्यमातून आपल्या युजर्ससाठी नवनवीन कल्पना अजमावत आहे. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादात गुगलपे ने आता ग्राहकांना नवे फिचर देऊन खुश करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच गुगल पे मध्ये डार्क मोड  फिचर येणार असून ‘व्हॉट्सअँप’आधीच गुगल पे ने बाजी मारलेली दिसून येत आहे.

गुगलकडून अलीकडेच युजर्ससाठी १० ऑपरेटिंग सिस्टिमची घोषणा केली. अँड्रोइड १० लाँच होण्याआधीच गुगल पेमध्ये डार्क मोड सुरू होईल. गुगल पेच्या 2.96.264233179 या व्हर्जनमध्ये डार्क मोड फिचर देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

स्मार्टफोनची बॅटरी लो झाल्यानंतर गुगल पेमध्ये डार्क मोड सुरू होईल. या नव्या फिचरमुळे बॅटरीची बचत होईल. गुगल पेमध्ये देण्यात येणारे डार्क मोडफिचर डीप ग्रेया थीमवर आधारीत असल्याचे समजते.

ट्विटर, फेसबुक मेसेंजरमध्ये डार्क मोड फिचर आधीपासूनच होते. आता काही स्मार्टफोन कंपन्यादेखील युजर इंटरफेसमध्ये डार्क मोड फिचर देण्याच्या प्रयत्नात आहेत. रात्री स्मार्टफोनचा वापर करताना या फिचरचा वापर केल्यास मोबाईल स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांवर येत नाही असे म्हटले जाते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!