Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

लोकसभा निवडणुक मतदानाची गुगलनेही घेतली ‘डूडल’च्या माध्यमातून दखल

Share

मुंबई | प्रतिनिधी

सात जागांसाठी विदर्भात मतदान आज सकाळपासून सुरु झाले आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. अतिसंवेदनशील भागातही मतदानाचा टक्का आज बऱ्यापैकी वाढलेला होता.

यासोबतच गुगल डूडलनेही मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.  देशातील लोकशाहीच्या या महापर्वाची दखल गुगल या जगप्रसिद्ध सर्ज इंजिनने घेतली आहे. गुगलने डुडलद्वारे मतदान करण्याचे आणि मतदान करण्याची प्रकिया समजावून सांगितली आहे.

गुगलकडून नेहमीच जनजागृती आणि जगप्रसिद्ध किंवा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान विशिष्ट डूडल तयार करून केला जातो.

गुगलच्या इंग्रजी अक्षरातील तिसऱ्या क्रमांकाचे O (ओ) हे अक्षर गुगलने मतदानरुपी दर्शवले आहे. त्यामध्ये, डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्याचे दिसत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!