Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकहून पुन्हा दिल्लीसाठी ‘विमानसेवा’; जेटच्या वेळापत्रकानुसार ‘अलायन्स एअर’ देणार सेवा

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक-दिल्ली आणि दिल्ली नाशिक-प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प असलेली विमानसेवा अखेर येत्या १५ जून २०१९ पासून पुन्हा एकदा सुरु होणार आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्स या कंपनीने जेट एअरवेजचे स्लॉट घेतले असून येत्या १५ जूनपासून नाशिक पुन्हा राजधानीकडे उड्डाण करू शकणार आहे.

१५ जून २०१८ साली सुरु झालेली नाशिक-दिल्ली जेट एअरवेजची विमानसेवा एप्रिल महिन्यापासून आर्थिक अडगळीत अडकली. यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रासही सोसावा लागला. अनेक प्रवाशांचे तिकिटे बुक केल्यानंतर पैसे परत मिळवण्यासाठी खेट्या घालाव्या लागल्या होत्या.

मात्र, पुन्हा एकदा नाशिक-दिल्लीची विमानसेवा सुरु होणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. १६२ आसनांचे विमान एअर अलायन्स कंपनी या मार्गावर वापरणार असून प्रवाशांनी येणाऱ्या काळात प्रतिसाद दिला तर दररोज ही सेवा देण्यात येईल अशी माहितीही एअर अलायन्सकडून देण्यात आली.

जेट एअरवेजने नाशिकहून दिल्लीला सुरु केलेली विमानसेवा प्रचंड प्रतिसादात सुरु होती. विशेष म्हणजे, ८० टक्क्यांपासून अधिक प्रवाशांनी या सेवेला पसंती दिली होती.

मात्र, जेट आर्थिक अडचणीत आल्यामुळे सर्व उड्डाणे जेटने थांबवली. त्यामुळे नाशिकची फायद्याची सेवाही नाईलाजाने जेटकडून थांबवण्यात आली.

‘उडे देश का आम आदमी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महात्वाकांशी असलेल्या ‘उडाण’ योजनेअंतर्गत जेटमध्ये काही आसने आरक्षित होत्या. सुरुवातीला बुकिंग करणाऱ्यांना या सेवेचा लाभ मिळत होता.

तसेच नाशिकहून पर्यटन, कामानिमित्त दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. त्यामुळे ही सेवा पहिल्या दिवसापासून प्रचंड प्रतिसादात सुरु होती.

नाशिक विमानतळाचा ताबा एचएएलकडे आहे. जेट अडचणीत आल्यानंतर एचएएलकडून इतर विमानसेवांना सेवा सुरु करण्याबाबत पत्र धाडण्यात आली होती. त्यानुसार हा स्लॉट एअर इंडियाने घेत सेवा सुरु करण्याचे नियोजन आखले आहे.

दर आठवड्यात तीन दिवस ही सेवा देण्यात येणार आहे. यासाठी एअर अलायन्सने जेट एअरवेजच्या वेळापत्रक आहे, त्याच स्थितीत वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवस ही सेवा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वेळाही तीच असणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!