Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान कात टाकणार; नूतनीकरनास प्रारंभ

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान म्हणजेच गोल्फ क्लब ग्राउंड कात टाकणार आहे. अत्याधुनिक उपकरणांसह मैदानाचा कायापालट होणार आहे. मैदानाच्या नुतनीकरणासाठी ११ कोटी २७ लाख ५३५ रुपयांचा निधी मंजूर झाला असून याअंतर्गत मैदानाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामांतर्गत बहुमजली पार्किंग या मूळ कामासाठी अनुदान प्राप्त झाले होते. त्यानंतर १४ मार्च २०१९ अन्वये मल्टीपर्पज पार्किंग कामाऐवजी गोल्फ क्लब मैदानाचा विकास केला जाणार आहे.

मैदानाच्या नूतनीकरणासंदर्भात नाशिकमधील बीटी कडलग कन्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीला १ जुलै रोजी कामाचा करारनामा करून दिला आहे. त्याअंतर्गत महापालिकेने नुकतेच एक सादरीकरण केले असून त्यांतर्गत मैदानावरील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत २१ फेब्रुवारी २०१९ रोजी मैदानाच्या नुतनीकरणाबाबतच्या ठरावास मंजुरी मिळाली होती.

यानुसार ९ कोटी ८५ लाख ८८ हजार ३०६ रुपये किंमतीचे काम दिनांक ०२ जुलै २०१९ ते ०१ एप्रिल २०२० या नऊ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ठेकेदाराने कामास गेल्या दोन आठवड्यांपासून कामास सुरुवात झाली आहे.

गोल्फ क्लब मैदानात जॉगिंग ट्रॅक, क्लॉक टाॅवर, पव्हेलियन इमारतीची दुरुस्ती, क्रिकेट मैदानाभोवती माउंटेड लंॅडस्केपिंग, पाण्याची व्यवस्था, उद्यानविषयक कामे,. विद्युतविषयक कामे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

गोल्फ क्लब मध्ये करण्यात येणारे काम महापालिका आणि राज्य शासनाच्या पन्नास टक्के निधीतून नूतनीकरन करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!