Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video Gallery : गोदावरीचा पूर; पाहा एका क्लिकवर

Share

नाशिक | प्रतिनिधी   

मागील तीन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. परिणामी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 80 टक्क्यांपर्यंत भरले आहे. दुपारी एक हजार क्युसेसने सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास साडेपाच त्यानंतर वाढवून पुन्हा सात हजारापर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले असून नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सोमेश्वर धबधबा, गांधी तलाव, रामकुंड, दुतोंड्या मारुती तसेच पुढे दसक पंचक परिसरात सायंकाळी नाशिककरांनी मोठी गर्दी पूर बघण्यासाठी केली होती.

निफाड तालुक्यातील चांदोरी, नांदूरमध्यमेश्वर येथेही मोठ्या संख्येने नागरिकांनी पाणी बघण्यासाठी गर्दी केली होती.नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून सर्वाधिक साठ हजार क्युसेसपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

मागील एक आठवड्यापासून राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातही वरुणराजा येता झाला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस कोसळत आहेत.

गोदावरीचा पूर पाहा एका क्लिकवर

१. अहिल्यादेवी होळकर पुलावरून घेतलेले विहंगम दृश्य

Dutondya maruti

गोदावरी नदीतील पुराचे परिमाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी#Nashik #Nasik #flood #BreakingNews

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, २९ जुलै, २०१९

२. नांदूरमध्यमेश्वर येथील बंधाऱ्यातून ६० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठी सावधानता बाळगा

nandur madhyameshwar

नांदूरमध्यमेश्वर येथील बंधाऱ्यातून ६० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठी सावधानता बाळगा

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, २९ जुलै, २०१९

३. चांदोरी येथील मंदिरे पाण्याखाली; गोदावरीच्या किनारी असणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा

Chandori

चांदोरी येथील मंदिरे पाण्याखाली; गोदावरीच्या किनारी असणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा #नाशिक #नासिक

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, २९ जुलै, २०१९

४. सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली; धोकेदायक सेल्फी टाळा

Someshwar Waterfall

सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली; धोकेदायक सेल्फी टाळा

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, २९ जुलै, २०१९

 

५. गोदामाई खळाळली

Godavari River

गोदामाई खळाळली#नाशिक #नासिक

Deshdoot यांनी वर पोस्ट केले रविवार, २८ जुलै, २०१९

६. गोदावरी नदीची सायंकाळी चार वाजेची परिस्थिती

७. सोमेश्वर येथील धबधबा 

.८. गोदामाईचे रौद्ररूप @गांधी तलाव परिसर 

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!