Photo Gallery : गोदावरीला पुन्हा पूर; दूतोंड्या मारुतीच्या पायाशी पाणी

0

नाशिक | कालपासून (दि.१६)  सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी पात्रात वाढ झालेली दिसून येत आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास १०१२ क्युसेस पाणी सोडल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग वाढला होता.

गोदापात्रात पाणी वाढल्यामुळे गंगेवरील साईबाबा मंदिर, महानुभाव पंथीय मंदिर तसेच यशवंतराव महाराज मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले होते. आज वाढलेल्या पाणी पातळीमुळे दुतोंड्या मारुतीच्या पायथ्याला पाणी लागले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरीला पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नियमित गंगेवर पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे गंगेवर लहानमोठे व्यावसायित व्यवसायासाठी याठिकाणी आलेले असतात, मात्र वाढलेल्या पाण्यामुळे आज ते याठिकाणी आढळून आले नाहीत. एकूणच आजच्या वाढलेल्या पाण्यामुळे गंगेवर काहीसे जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, गोदावरी नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीच्या संततधार पावसानंतर दिवसभरात नाशिकमध्ये उघडीप दिली आहे त्यामुळे अद्याप कुठल्याही प्रकारे विसर्ग वाढविण्याबाबत कुठलीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

(संकलन : मोहन कानकाटे, अनिरुद्ध जोशी)

फोटो : सतीश देवगिरे, मोहन कानकाटे आणि अनिरुद्ध जोशी

LEAVE A REPLY

*