Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

प्रेमभंगातून करणार होती आत्महत्या; निर्भया पथकानेे युवतीचे प्राण वाचवत केले समुपदेशन

Share

नाशिक । प्रतिनिधी

प्रेमभंगातून आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या युवतीस मानसिक बळ देऊन तीचा जीव वाचवून तीला घरी पोहचवण्याचे कार्य नाशिक पोलीसच्या निर्भया पथकाने आज केले. हा प्रकार आज दुपारी सोमेश्वर परिसरात घडला.

पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, मुंबई नाका भागातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणर्‍या व तेथेच राहणार्‍या एका 22 वर्षीय युवतीचे तीच्या मित्राशी वाद झाले होते. प्रेमभंगामुळे आता सर्वस्व संपले असा विचार करून सदर युवती आत्महत्या करण्याच्या विचारात दुपारी 12 वाजेच्यासुमारास गंगापूर परिसरातील सोमेश्वर येथे नदी किनारी पोहचली.

ती 2 वेळा नदीपात्राच्या पाण्यापर्यंत पोहचून परत माघारी फिरल्याचे एका चाणक्ष रिक्षाचालकाने पाहिले. यानंतर ती युवती एके ठिकाणी येऊन बसली. दोन तीन तासापासून ती एकटीच नदीकिनारी वावरत असल्याने काही संशय आल्याने रिक्षाचालकाने तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधला.

ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्यासह त्यांचे निर्भया पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी सबंधीत युवतीला विश्वासात घेऊन चर्चा केली.

मात्र, ती काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. निर्भया पथकाने युवतीच्या मोबाईलवरून तिच्या मैत्रीणीकडून माहिती घेतली असता मित्राबरोबर वाद झाल्यामुळे सदर युवती मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त झाली होती.

यातून तीने असा चुकीचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले. सूर्यवंशी व निर्भया पथकाने समुपदेशन करून युवतीची समजूत घातली. तसेच तीच्या मित्रालाही फोनवरून समजून सांगितले. त्या युवतीला पोलिसांनी तिच्या मैत्रिणीच्या स्वाधीन केले.


आत्महत्या मार्ग नव्हे

आजकालच्या सुपर फास्ट जामान्यात प्रेम होणे आणि प्रेमभंग होणे या गोष्टीही झटपट होताना दिसतात. मुली या भाबड्या असतात. त्या सहज युवकांच्या इमोश्नल ब्लॅकमेकिंगला बळी पडतात. एकतर मुलींनी सारासार विचार करून आपल्या आई वडिलांचे संस्कार डोळ्यासमोर ठेवून यात फसू नये. तसेच प्रेमभंगाचे दुख: उराशी बाळगून पळपूट्या प्रेमिकांसाठी जीव संपविण्याचा विचारही करून नये. उलट अशा फसव्या युवकांच्या तावडीतून वाचल्याचे समाधान माणुन आपल्या पायावर उभे राहत, आपल्या नव्या जीवनाला सुरूवात करावी. प्रेमभंगावर आत्महत्या हा मार्ग नव्हे.

– पौर्णिमा चौघुले, पोलीस उपायुक्त.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!