Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

खडसेंची नाराजी दूर; भाजपचे बंडखोर निवडून येणार नाहीत – महाजन

Share

नाशिक | प्रतिनिधी 

उमेदवारी देण्यात स्पर्धा वाढली आहे; त्यामुळे एकाला उमेदवारी दिली की इतर चार जण नाराज होणारच आहेत. पक्षासोबत ज्यांनी बंडखोरी करून इतर पक्षातून उमेदवारी लढविण्याचे ठरवले आहे ते निवडून येणार नाहीत अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ते नाशिकमध्ये आल्यानंतर महाजन माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, बाळासाहेब सानप यांना आपण स्वतः फोन करून उमेदवारी करू नका असे सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडा मैदान असल्याने मिळेल त्या पक्षाच्या तिकिटावर स्वार होण्यासाठी इच्छुक आतुरले होते. त्यामुळे अजून माघारीचा दिवस यायचा आहे. माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल अशा शब्दांत महाजन यांनी बंडखोरांना एकप्रकारे माघार घेण्याची विनंतीच केली आहे.

देशात भाजप पक्षाची स्थिती कशी आहे सर्वांना माहिती आहे. यामुळे उमेदवारी मिळवण्यात मोठी स्पर्धा होती. पक्षश्रेष्ठींच्या पुढेही पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र, आम्हाला वाटते योग्य उमेदवार दिले गेले आहेत.

तिकीट न मिळाल्याने राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे हे मान्य आहे. मात्र, सोमवारनंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याबाबत विचारलेल्या नाराजीच्या प्रश्नावर महाजन म्हणाले की, खडसे यांचा विषय  संपला असून त्यांच्या कन्येला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराजीचे आता काही कारण नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!