Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : कसमादेची जीवनवाहिनी ‘गिरणा’ नदीही खळाळली

Share

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून कळवण, सुरगाणा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे येथील धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून आज चणकापूर व पुनद धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे कसमादेची जीवनवाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गिरणा नदीला पूर आला आहे.  नदीकाठी सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे चणकापुर व पुनंद धरण्याच्या पाणलोट क्षेत्रातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे परिसरातील धरणाच्या पाणी साठयात झपाट्याने वाढ झाली आहे.

आज सकाळी चणकापुर धरणातून 2038 क्यूसेस तर पुनंद धरणातून 3139 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला त्यामुळे  गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

Girna River flood

गोदेनंतर गिरणाही खळाळली

Deshdoot यांनी वर पोस्ट केले बुधवार, ३१ जुलै, २०१९

गिरणा सोबत पुनंदनदीला देखील पूर आल्याने दोन्ही नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चणकापुर व पुनंद धरणात पाणीसाठा वाढल्याने पाणी टंचाईला तोंड देत असलेले मालेगाव शहरासह कळवण,देवळा सटाणा तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

गिरणा नदीचे पाणी नांदगाव तालुक्यात असलेल्या गिरणा डॅम मध्ये जाते. या डॅममधून जळगाव जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो. गिरणा नदीला आलेल्या पुराचे पाणी गिरणा डॅममध्ये जात असल्याने डॅमच्या पाण्याच्या साठ्यात वाढ होत असल्याने जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!