पुण्यातील भऊरकरांनो बातमी तुमच्यासाठी; तुम्हीही या, ओळख द्या, ओळख करून घ्या…

0

भऊर | बाबा पवार

आजच्या स्मार्टफोनच्या युगात सर्वच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र परिवार, आप्तेष्ट यांच्याशी संपर्कात असतात. मात्र, प्रत्यक्षात भेटण्यास कुणाला वेळ नाही. एकाच गावातील रहिवासी असून एकाच शहरात नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरीत झालो. मात्र, भेट होत नाही, साधी ओळखही नाही. त्यामुळे काही युवकांनी एकत्र येऊन अभिनव भेटीचा सोहळा पुण्यातील भऊरकरांसाठी आयोजित केला आहे. या संकल्पनेचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले आहे.

भऊरचे रहिवाशी आणि सध्याचे पुणेकर सतीश पवार यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. अगदी एकाच शहरात, एकाच परिसरात आपल्या गावातील मित्र परिवार वास्तव्यास आहे याची साधी कल्पनाही नसते, किंबहुना ओळखही नसते.

या सर्वांच्या भेटीगाठी, ओळख परिचय व्हावा म्हणून पुणे स्थित भऊरवासी यांचा ओळख परिचय या अभिनव कार्यक्रम करण्याची संकल्पना सतीश पोपट पवार यांच्या विचारात आली व ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केली.

पाहतात पाहता भऊरचे तरुण या कामात सरसावले सोशल मीडियाचा वापर करत पुण्यात असलेल्या जवळ-जवळ सर्वच भऊरकरांशी संपर्क झाला.  त्यानंतर संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरवले. १३ जानेवारी रोजी पुण्यात नोकरी, कामानिमित्त असलेल्या भऊरकरांचे भव्य संमेलन पार पडणार आहे.

हॉटेल क्रिस्टल हट, स्वराज गार्डन हॉटेल समोर, स्वराज चौक, नाशिक फाटा रोड, पिंपळे सौदागर. येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी संदीप पवार, पवन पवार, निवृत्ती पवार, विशाल पवार, शाहू पवार, महेंद्र पवार, अमित पवार हे परिश्रम घेत आहेत. स्वागत चहा, कुटूंबाचा परिचय, भोजन या पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे.

आपण भऊरकर असाल व आपले पुण्यात वास्तव्य असेल तर खालील नंबर वरती संपर्क साधता आपणही या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता.

संदीप पवार : 9890980869, पवन पवार : 7588040483, निवृत्ती पवार:9665736670, विशाल पवार : 8149235005, शाहू पवार: 9975945549, महेंद्र पवार : 7588617702, अमित पवार : 9822402126

साखळी वाढतच जाणार

गावापासून आपण दूर असल्यावर आपल्या सुख दुःखात कुणीतरी जवळचे असावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र, एकाच शहरात राहून अपरिचित असलेल्या व परिचित सर्वांच्या भेटी होण्यासाठी, आपल्या गावातील व्यक्ती नक्की कुठल्या क्षेत्रात गावचे नाव उज्वल करत आहेत. महत्वाचे म्हणजे परिचय होऊन सुख दुखःत सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी प्रत्येकाला भेटस्वरूप तुळस, फुलझाडे अशी भेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यात गावाकडील मुलांना नोकरी संदर्भात मार्गदर्शनदेखील याठिकाणी केले जाणार आहे. त्यामुळे गावाकडचे अनेक तरुण आता शहरात आल्यानंतर त्यांना हक्काचे घर एका अर्थाने उपलब्ध होणार आहे. ही साखळी वाढतच जाणार आहे.

  • सतीश पवार (आयोजक)

LEAVE A REPLY

*