Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या हिट-चाट

अधुरे जीवन गाणे; नाशिकच्या गायिका गीता माळी यांचा जीवनप्रवास

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे आज अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाने नाशिकच्या कलाक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देशदूत कर्मयोगिनी पुरस्कारासाठी गीता माळी यांना गेल्या वर्षी नामांकन प्राप्त झाले होते. यादरम्यान त्यांची मुलाखत ‘देशदूत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. 

गीता माळी यांचे शिक्षण ओझरखेड, दिंडोरी व नाशिकमध्ये झाले. घरी आध्यात्मिक वातावरण होते. अभंग नामसर्ंकीतन यासाठी टाळ-मृदुंगाच्या वातावरणात घर अक्षरश: भक्तीरसात न्हावून निघत. बालपणी त्यांनी कधी गायनाला सुरुवात केली हे त्यांनाही कळाले नाही. सानेगुरुजी आंतरशालेय स्पर्धेत ‘घट डोईवर घट कमळ’हे गीत पहिल्यांदा गीता माळी यांनी गायले आणि त्याला प्रथम पारितोषिक मिळाले. येथून त्यांची बालगायिका म्हणून ओळख झाली.

नाशिक : गायिका गीता माळी यांचे अपघातात निधन

 

घरची परिस्थिती बेताची होती. परंतु, त्यांची गाण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नसे. त्याकाळी त्यांनी पावसापाण्याची पर्वा न करता ८ ते १० किलोमीटर पायी संगीत क्लाससाठी जात जाऊन स्वरसाधना केली. गुरुजी शरद घोडके यांनी त्यांना प्रारंभीक संगीताचे धडे दिले.
एमएमआरके महाविद्यालयात गिताताईंहनी शास्त्रीय गायन विषय घेऊन बीए पूर्ण केले.

आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सवात विद्यापीठाला सलग तीन वर्षे गोल्ड मेडल मिळवून आणले. त्यानंतर एका आंतरराष्ट्रीय संस्थेची स्कॉलरशिप त्यांना मिळाली. मुंबईत एमए पूर्ण केले. नादब्रह्म ग्रुपमध्ये पहिल्यांदा व्यावसायिक रुपात गाणे गायिले. कौटुंबिक कार्यक्रम, विवाह यांच्यासाठी ऑकेस्ट्रामध्ये त्या प्रारंभीच्या काळात गाणी गात असत.  ‘फुलले रे क्षण माझे’ हे त्यांचे पहिले गाणे होते.

माहेरी गीताताईंना चित्रपटातील किंवा इतर गाणी गाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे केवळ भक्तिगीत, भजने मी गात होते. मात्र, विवाहानंतर सिनेमाची गाणी गाण्यासाठी त्यांच्या पतीने त्यांना प्रोत्साहन दिले. मुलाला पतीराजांकडे सोपवून त्यांनी गायनप्रवास सुरु ठेवला.

काही काळच त्यांनी छोट्या ऑकेस्ट्रामधून गायला प्रारंभ केला. पण नंतर त्यांच्यातील आतला आवाज ते करण्यास मनाई करु लागला. ‘‘हे आपले उद्दिष्ट नाही तू नवे काहीतरी करायला पाहिजे, असा अंतर्नाद मला ऐकू येऊ लागला’ गीता ताई सांगत असते.

सन २०१३ पहिल्यांदा ‘सदाबहार आशा’ हा त्यांचा स्वत:चा असा मोठा थिएटर सादर झाला. त्यावेळी त्या अगदी नवोदित होत्या. येथून कलेला विस्तीर्ण क्षितीज त्याांना मिळला आणि गीता माळी ने नाव नावारुपाला येऊ लागले. कार्यक्रमांमधून त्या आशाताईंची अनवट चालीपासून ते ‘रंगिला’पर्यंतची गाणी गात असे. नवी, जुनी तब्बल ४० गाणी त्यांनी गायली. त्यांचा पहिलाच शो हाऊसफुल्लचा मान मिळवून गेला. या कार्यक्रमाने त्यांच्या गाण्यात आणि पंखात चांगलेच बळ, आत्मविश्‍वास आला. त्यानंतर अनमोल लता हा लतादिदींवरचा कार्यक्रमही तेव्हा प्रचंड लोकप्रिय केला.

सन२०१५ मध्ंये भारतीय कला आणि संस्कती प्राचीन वारश्यांचे संवर्धन करणार्‍या ‘मुक्तबोध’ संस्थेतर्फे गीताताईंना अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये भारतीय बेसिक शास्त्रीय संगीताचे शिक्षण देण्याची संधी मिळाली. त्याच दरम्यान तिथे अनेक भक्ती संगीताचे कार्यक्रम झाले.

भारतीयांव्यतिरिक्त विदेशी रसिकांनी त्यांच्या गायनाचे कौतुक केले. ‘‘आम्हाला या गाण्याचा अर्थ कळाला नाही, परंतु ते ऐकल्यावर आध्यातिक शांतीचा अनुभव मिळाल्याची त्यांची पावती मला खूप सुखावून गेली’’ असे गिता ताईंनी तिथला अनुभव मुलाखतीत सांगत.
ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी त्यांनी संगीत सभा केल्या. शरद पोंक्षे यांच्याकडून त्यांना सिडनी येथे जाण्याची संधी मिळाली.

सावरकरांची गाणी तिथे झालीच पाहिजे, यासाठी त्यांनी तिथल्या महाराष्ट्र मंडळाला संपर्क केला. गीताताईंची गाणी पाहून त्यांनी मला तिथे बोलवण्यात आले. सावरकारांची गाणी गाणार होेते. मला ऑस्टे्रलियन वकिलातीतून विजा येणार होता. परंतु माझ्यासोबत जे लोक जाणार होते त्यांचा विसा नाकारण्यात आला.

तिकीटही कॅन्सल झाले, परंतु मला विसा मिळाला. मी एक दिवस आधी तिथे गेले. माझ्या सोबतच्या कलाकरांना येण्यास उशिरा झाला. त्यावेळी सहज रियाज करावा, आवाज चेक करावा म्हणून मागे उभा मंगेश हे गीत सुरू केले. हे गाणे मी सहज गायले. त्यानंतर टाळ्यांचा प्रचंड गरज मला ऐकू आला. सर्व कलाकारांना उशीर होणार म्हणून मला तिथल्या रसिकांनी गाण्यासाठी आर्जव केले. मुख्य कलाकार येईपर्यंत मी मराठी गीते गायली.

त्यावेळी एक आजोबा उठले आणि म्हणाले आता गीतरामायणातील रचना गाणे माझ्यासाठी हे खूप मोठे आव्हान होेते. पण रसिकांची फर्माईश म्हणून मी ते पूर्ण केले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्या एका कार्यक्रमाने मला ऑस्ट्रेलियात ५ नवे कार्यक्रम मिळाले’’. गीताताई ही आठवण सांगताना अतिशय हळव्या होत.

पं. अविराज तायडे, शंकराव वैरागकर, शरद घोडके, धनंजय धुमाळ यांनी त्यांना गायनात पूढे नेले. आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांच्यावर त्यांची असिम श्रद्धा होती.

कीर्ती, प्रसिद्धी, पैसा यासोबत कलाकारांना एक भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असायला हवे असे त्या म्हणत. आध्यात्मिक गुरू गणेशपुरीचे स्वामी चिद्विलासानंद यांच्यामुळे माझे स्त्रोत्र, ऋचा वाणी अति बहरली. असे त्या आवर्जून नमूद करण्यास विसरत नसे.
अशोक पत्की यांना गीताताईंनी आपल्या आवाजातील गणपती अथर्वशीर्ष रात्री रेकॉर्ड करुन पाठवले होते.

ते ऐकून तूझा आवाज मधूर आवाज आहे. तुझे हे स्त्रोत्र अप्रतिम आहे. यानंतर माझे संस्कृत श्‍लोकावरील जे कुठले प्रोजक्ट असतील ते फक्त तुलाच देणार आहे, असे अशोक पत्की यांनी त्यांना सांगितले. ‘‘हे गाणे गाण्यास तूला किती तास लागले असे विचारले होते ? वास्तविक अर्धा तासात गीताताईंनी ‘वनटेक’ रेकॉर्ड केले होते.

कलाकार म्हणून त्या नेहमी संवादी राहत. रसिकांमुळे कलाकार घडत जातो. त्यामुळे त्यांचे कान तृप्त करण्यासाठी जे काही करावे लागते ते आमचे कर्तव्य आहे, असे त्या सांंगत.

वाघाबॉर्डरला गीताताई पहिल्यांदा गेल्या होत्या तेव्हा तेथील देशभक्तीने ओतप्रत भरलेले वातावरण पाहून त्यांनी सरहद्दीवर बंदोबस्त ठेवणारे जवानांचे कडे भेदून त्या इतर जवानांची भेट घेतली होती. तिथे जवानांचा तो जोश पाहून त्या रडल्या होत्या. पोलिसांनीही त्यांना तेव्हा आडवले नव्हते.

लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट नावाचा माझा शो च्या दिवशी त्यांचाकव्याने माझा आवाज गेला. त्या थिमबेस सॉंग्ज गाणार होत्या. तिकीट विक्री झालेली असल्याने मला कार्यक्रम थांबवता येणार नव्हता. त्यावेळी स्टेरॉईडस्चे इंजेक्शनस् घेऊन त्यांनी शो मस्ट गो ऑन प्रमाणे गाणे गायले.

नंतर धुळ्यात शोसाठी जाताना त्यांचा अपघात झाला मात्र तेव्हा मोडलेल्या-प्लास्टर घातलेल्या हाताने त्यांनी गाणे गायले होेते मात्र आज झालेल्या या अपघाताने त्यांना आपल्यातून कायमचेच हिरावून घेतले. पराधीन आहे जगती ……हेच खरे.

जीवन व्हावे सुरेल गाणे गीता माळी नेहमी म्हणत. गीताताई तूम्ही आयुष्याचे सुरेल गाणे करत होता….मग या प्रवासात ‘जीवन गाणे अधुरे टाकून कुठे गेलात…..?

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी……

गीताताई तूम्ही आज आमच्यात नाहीत. परंतू तुमच्या मधूर आवाजाने तूम्ही याच जन्मात तुमच्या अविट स्वरांनी नव्याने जन्म घेत राहाल.

शब्दांकन : निल कुलकर्णी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!