Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष पथकाची कारवाई

Share

नाशिक | प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील खालची पेठ येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेने छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी एकूण १ लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इगतपुरी परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक फिरत होते. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने इगतपुरी गावातील खालची पेठ परिसरात शनिचौक याठिकाणी छापा टाकला असता याठिकाणी अखिल खान रज्जाक खान, रा. महादेव नगर, शनिचौक, इगतपुरी, सचिन गुलाब हिवाळे, रा. इगतपुरी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या घरगुती गॅसमधुन मशिनचे सहाय्याने चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरतांना मिळुन आले.

त्यांच्या ताब्यातून भारत गॅस कंपनीचे १५.८ किलो  वजनाचे एकुण १७ सिलेंडर, गॅस भरण्याचे मशिन व एक मारुती ओमनी कार असा एकुण १ लाख ४ हजार ४५० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!