Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर @ ८४ टक्के; पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग ५ हजार क्युसेकने घटवला

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या एक आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून १२ हजार क्युसेकच्या सरासरीने विसर्ग करण्यात आला होता. मात्र, बुधवारी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यानंतर सकाळी ७ हजार ८३३ क्युसेकने होत असलेला पाण्याचा विसर्ग दुपारी चार वाजेच्या सुमारास कमी करत ३ हजार १६८ क्युसेकवर नेण्यात आला आहे. यामुळे गोदावरीला आलेली पूरसदृश्य परिस्थिती काहीशी कमी होणार आहे.

दारणा धरण ८७ टक्के भरले असून धरणातून १३ हजार ०५८ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तर गंगापूर धरणातून होत असलेला विसर्ग सायंकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

गेल्या आठवडेभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाची पाण्याची पातळी ८० टक्क्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर प्रशासनाकडून गोदावरीत विसर्ग करण्यात आला होता.

दोन ते तीन दिवस पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. गंगापूर धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. परिणामी  रामकुंड परिसरातील लहान मंदिरे, पूल पाण्याखाली बुडाले.

दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते. नाशिक शहरात आज दिवसभर अधूनमधून पावसाची हजेरी कायम होती. अधूनमधून नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शनही घडले.

दरम्यान, पावसाचा जोर आज ओसरल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग घटविण्यात आला आहे. इतर धरणांचादेखील विसर्ग घटविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!