Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Breaking News : नाशिकमध्ये युवकावर सामुहिक अत्याचार; धक्कादायक प्रकाराने शहर हादरले

Share

पंचवटी | प्रतिनिधी 

केरळ राज्यातून नाशिकमध्ये लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी आलेल्या ३२ वर्षीय युवकावर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील तपोवन परिसरात घडला. याप्रकरणी सायंकाळी उशिरा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत.

याप्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार,  लग्नपत्रिका वाटपाच्या निमित्ताने आपण नाशिकमध्ये आल्याचे त्याने सांगितले. हा युवक पंचवटी परिसरातील एका लॉजवर मुक्कामी होता. रात्री जेवणासाठी भद्रकाली परिसरात हा युवक गेला. रात्री उशीर झाल्याने त्याने बारा वाजेच्या सुमारास या परिसरात उभ्या असलेल्या रिक्षावाल्यास लॉजवर सोडण्यास सांगितले. रिक्षाचालक तिथून या व्यक्तीला घेऊन निघाला.

भद्रकाली परिसरातून दामोदर थियेटरच्या नजीक या रिक्षामध्ये रिक्षाचालकाचे चार मित्र बसले. त्यानंतर मागून दुचाकीने चार जन रिक्षाच्या पाठीमागून येत होते. पुढे एका ठिकाणाहून रिक्षाचालकाच्या साथीदारांनी मद्याच्या बाटल्या रिक्षामध्ये दिल्या.

दरम्यान, या व्यक्तीला नाशिकचे रस्ते माहिती नसल्याने त्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षा थेट तपोवनात नेली.

याठिकाणी निर्मनुष्य भागात रिक्षाचालकासह त्याचे सहा ते सात मित्र मद्य प्राशन करण्यासाठी बसले. हा युवकही त्यांच्यासोबतच होता. त्यासही या व्यक्तींनी बळजबरीने मद्य पाजले. त्यानंतर त्याच्यावर याठिकाणी अनैसर्गिक अत्याचार केल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. काही वेळाने संशयित या व्यक्तीला तिथेच सोडून फरार झाले.

त्यानंतर भयभीत झालेला व्यक्ती शेजारील मंदिरात मदतीसाठी गेला. तेथील पुजाऱ्याने त्यास कपडे देत झोपण्यासाठी जागा दिली. सकाळी उठल्यानंतर त्याने आडगाव पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर घटना भद्रकाली परिसरात घडली असल्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात जावे लागेल असे सांगण्यात आले. दरम्यान, दिवसभर या व्यक्तीने पोलीस ठाण्यात घिरट्या घातल्या. अखेर भद्रकाली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिराने मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

व्यक्ती केरळचा…

मिळालेल्या माहितीनुसार हा ३२ वर्षीय युवक केरळचा आहे. तो नाशकात लग्नाच्या पत्रिका वाटपासाठी आला होता. जेवणासाठी तो भद्रकाली परिसरात गेला होता. रात्री उशीर झाल्याने त्याने रिक्षाचालकास लॉजवर सोडण्यास सांगितले. त्यानंतर हा प्रकार घडला.

Tags:

You Might also Like

1 Comment

  1. नागपुरकर June 5, 2019 7:10 pm

    नाशिक सारख्या ठिकाणी घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे़. या पुढे नाशिक मध्ये पर्यटन करण्यासाठी यायचे का नाही या विषय गांभीर्याने विचार करावा लागेल.

    Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!