गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नाशिकच्या बाजारपेठा गजबजल्या

0
छायाचित्र : सतीश देवगिरे, देशदूत

नाशिक, ता. ११ : दोनच दिवसांवर आलेला गणेशोत्सव आणि उद्या असलेल्या हरतालिका सणाच्या खरेदीसाठी आज सकाळपासूनच नाशिक शहरातील मेनरोड, दहिपूल, सराफबाजार, रविवार कारंजा परिसरातील दुकाने खरेदीदारांनी गजबजली आहेत.

काल भारत बंद मुळे नाशिकच्या बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे नाशिक शहरासह बाहेरगावाहून खरेदीसाठी येणाऱ्या लोकांचा भ्रमनिरास झाला. मात्र आज सकाळपासूनच नाशिककरांनी गौरी गणपतीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.

 

त्यामुळे सकाळी दहाच्या सुमारास महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, दहिपूल परिसरात प्रचंड वाहन कोंडी झाली.

गणेशोत्सवामुळे बाजारपेठांत उत्सवी वातावरण असून आगामी काळात नाशिकच्या मार्केटमधील उलाढाल वाढणार असल्याने सध्या व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*