Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video Gallery : लाडक्या गणरायाला निरोप; ढोल ताशांच्या गजरात परिसर निनादला

Share

नाशिक | प्रतिनिधी 

महापालिकेच्या मानाच्या गणपतीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत गणेश विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली. गणेश विसर्जन मिरवणूक आता एमजीरोड परिसरातून अशोकस्तंभ मार्गे रविवार कारंजाकडे मार्गक्रमण करत आहे.

चांदीचा गणपती

चांदीच्या गणपतीची शाही मिरवणूक

Deshdoot यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, गुलालवाडी लेझीम पथकाच्या कसरती, लहान बंजोंमुळे मिरवणुकीत रंगत आणली आहे. ठिकठिकाणी विविध पक्षांच्या आणि संस्थांच्या माध्यामातून मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत केले जात आहे.

पालकमंत्री गिरीश महाजनांनी वाजवला ढोल; डीवायएसपी मंगलसिंग सूर्यवंशी यांनी धरला ठेका

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. प्रारंभी पालकमंत्री गिरीश महाजनांनी ढोल वाजवत लक्ष वेधले तर; वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनीही ठेका धरला. ढोल पथकांनी मिरवणूक मार्ग निनादला आहे तर दुसरीकडे अनेक गुलालवाडी लेझीम पथकाने गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वांचेच दरवर्षीप्रमाणे लक्ष वेधले.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!