Type to search

Breaking News Featured नाशिक

नाशिककरांचा मूर्तीदानाला प्रतिसाद; हजारो गणेशमूर्ती संकलीत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरासह जिल्ह्याभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. नाशिकमध्ये अनेक संस्था गोदाप्रदुषण रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती करत मूर्तीदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनालादेखील सुजाण नाशिककरांनी तेव्हढ्यात आत्मीयतेने प्रतिसाद दिला असून आज सकाळपासून हजारो गणेशमूर्ती वेगवेळ्या भागात संकलित करण्यात आल्या आहेत.

यामध्ये पंचवटी, नाशिकरोड, औरंगाबाद रोड, नवीन नाशिक, सातपूर परिसरातून सर्वाधिक गणेशमूर्ती संकलित झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळत आहे.

दरम्यान महापालिकेकडून गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी कुत्रिम तलाव करण्यात आले आहेत. तिथेही मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज निरोप देण्याच्या दिवशी अनेक गणेशभक्त भावूक झालेले बघायला मिळाले.

Leave a Comment

error: Content is protected !!