Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

यंदा गणेश विसर्जन मिरवणुक पारंपारिक मार्गानेच; मेहर ते स्तंभ स्मार्टरोड आठवडाभरात पुर्ण करण्याचे आदेश

Share
file photo

नाशिक ।  प्रतिनिधी

गणेश विसर्जन मिरवणुक पारंपारिक मार्गानेच काढण्याचा आग्रह शहरातील गणेश मंडळांनी धरल्यानंतर महापालिका, स्मार्टसिटी, पोलीस व मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी स्मार्टरोडची संयुक्त पाहणी केली. आठवडाभराच्या कालावधीत मेहर सिग्नल ते अशोकस्तंभ पर्यंतच्या स्मार्टरोडचे काम पुर्ण करण्याचे आदेश मनाचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश थविल यांनी दिले आहेत.

आज दुपारी मेहर सिग्नल ते अशोक स्तंभ असा संयुक्त पाहणी दौरा पार पडला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश थविल यांनी स्मार्टरोडचे काम करणार्‍या कंत्राटदारास काम पुर्ण करण्याबाबत सुचना केल्या. यावेळी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक हेमंत सोमवंशी, सुर्यप्रकाश नवप्रकाश मित्र मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे तसेच इतर मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत गणेश मंडळांनी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. यामध्ये म्हटले होते की 2 ते 12 सप्टेबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होत आहे.

सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक स्तंभ परिसरात मोठ्या प्रमाणात मंडळाचे गणपती असतात. यामुळे या परिरात भाविकांची दहाही दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर दर्शन तसेच आरास पाहण्यासाठी याच भागातून भाविक रविवार कारंजा व इतरत्र जात असतात.

प्रामुख्याने अखेरच्या दिवशी निघणारी गणेश विसर्जन मिरवणुक ही पारंपरिक मार्ग असलेल्या महात्मागांधी रोड नंतर मेहर सिग्नल, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा व पुढे पंचवटीत गोदावरी नदीवर जाते. ती यंदाही याच मार्गे नेली जाणार आहे. ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

परंतु सदर मार्गातील मेहर सिग्नल ते अशोक स्तंभ परिसरात स्मार्टरोडचे काम सुरू असून ते अपुर्ण अस्थेत आहे. एका बाजून वाहुक सुरू असली तरी या बाजूने तीन ठिकाणी मोठे उंचवटे तयार करण्यात आलेले आहेत.

यामुळे 15 ते 20 फुट उंच मुर्ती घेऊन जाणारी वाहने या ठिकाणी आदळून अपघात होण्याची तसेच मुर्तींची भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे स्मार्टरोडचे काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार आज संयुक्त पाहणी दौरा झाला यात नाशिक महापलिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश थविल यांनी कंत्राटदारास सुचना केल्या. रस्ता दुभाजकात आणि काम सुरु असलेल्या ठिकाणी लोखंडी गज बाहेर असल्याने त्यामुळे दुखापत होण्याचे शक्यता पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यानी व्यक्त केली. तर मंडळांच्या पदाधिकार्‍यांनीअने तृटी दाखवल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!