Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : नाशिकमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून आस लावून बसलेल्या नाशिककरांनी आज अभूतपूर्व उत्साहात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली. सकाळपासून घराघरांत चैतन्याचे वातावरण होते. गणरायाची मूर्ती घेण्यासाठी अनेकांनी जवळच्या स्टालवर गर्दी केली होती. रेड क्रॉस सिग्नल, रविवार कारंजा, अशोक स्तंभ परिसरात ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाची मिरवणूकदेखील काढण्यात आली.

गणरायाच्या पहिल्या नैव्यद्यासाठी लागणारी मिक्स भाजी, दुर्वा, फळे, पत्रीची दुकाने रविवार कारंजा परिसरात सजली होती. याठिकाणी महिलावर्गाने मोठी गर्दी केलेली दिसून आली. यासोबतच अबालवृद्धांनी लाडक्या गणरायाच्या स्वागत मिरवणुकीत सहभाग घेतला.

रामकुंड परिसर, रविवार कारंजा, सीबीएस, ठक्कर बाजार, ठक्कर डोम परिसरात गणेशभक्तांची मोठी गर्दी होती. महापालिकेने परवानगी दिलेल्या दुकानांवर मोठी गर्दी यावेळी दिसून आली. गेल्या दोन दिवसापेक्षा आज अखेरच्या दिवशी गणेशमूर्तीच्या किंमती काहीशा कमी झालेल्या दिसून आल्या.

गेल्या काही दिवसांपूर्वी बुक केलेल्या गणरायाच्या मूर्ती आज सकाळपासून घेण्यासाठी मोठी गर्दी दुकानांत झाली होती. कुणी रिक्षावर मूर्ती नेल्या तर कुणी दुचाकीवर. एकूनच आजचा दिवस नाशिककरांच्या गणेश भक्तीतून भक्तिमय झालेला दिसून आला. लग्नसराई नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ढोल ताशा व्यावसायिकांची आज चांदी झाली.

आमचे प्रतिनिधी सतीश देवगिरे यांनी काढलेले काही निवडक छायाचित्रे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!