Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लोकसहभागातून त्र्यंबकेश्वरला क्रांतिकारकांचे म्युझियम साकारणार

Share

नाशिक : प्रतिनिधी

अध्यात्मिक मानवतावादी उद्देशाने काम करणार्‍या रॉयस्मि मिशनतर्फे भारतीय क्रांतीकारकांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम साकारण्याचा मानस आहे. विशेष म्हणजे, लोकसहभागातून हे म्युझियम साकारणार असून याद्वारे क्रांतिकारकांचे कार्य जनतेला समजेल  आजच्या तरूणाईला क्रांतीकारकारकांच्या जीवनकार्यातून प्रेरणा मिळेल.

चांगल्या संस्काराबरोबरच रोजगारही मिळावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती मिशनचे प्रवर्तक राजेशजी यांनी केले.  स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या रॉयस्मि मिशनद्वारे देशातील 34 केंद्र आणि इतर 11 देशांत अध्यात्मिक कार्य सुरू आहे.

त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात देश -विदेशातील भाविक आणि पर्यटक येतात.धार्मिक अधिष्ठान असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या भूमीत दुबईतील मजहर शहराच्या धर्तीवर  म्युझियम करण्यात येणार आहे.

यात स्वा. सावरकरांसारख्या क्रांतीकारकांच्या जीवनाचा परियच, बलिदानाचा प्रसंग, क्रांतीकारकांच्या कार्याच्या अमर प्रेरणा, एकात्मतेची भावन समर्पित करणे आदी बाबींचा समावेश केला जाणार आहे.

त्याठिकाणी छोट्या-मोठ्या उद्योगधंदे, पर्यावरण पूरक परिसर निर्माण करणे, तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी, तरूणांना रोजगार देण्याचा मानसही राजेशजी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी दिनेश पाटील, सुरेश दराडे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!