Type to search

नाशिक

सिन्नर : घोटी महामार्गावर चार टन गोमांस पकडले

Share
सिन्नर | अजित देसाई 
सिन्नर घोटी महामार्गावर आज दि.10 मध्यरात्री बजरंग दल, गोवंश रक्षा दलाचे कार्यकर्ते व सिन्नर पोलिसांच्या गस्ती पथकाने भाटवाडी शिवारात हॉटेल निसर्ग जवळ गोमांस वाहतूक करणारा टेंम्पो पकडला. या टेम्पोतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे चार टन मांसासह 1लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर बाजूकडून अवैध मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पोची माहिती बजरंग दलाच्या  कार्यकर्त्यांना मिळाली होती.  मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती क्रमांक  एमएच 08 पी 6499 घोटी मार्गावर हॉटेल निसर्ग जवळ बजरंग दलाचे विकी वरंदळ, गोरक्षा समितीचे रामनाथ धनगर यांचेसह  कार्यकर्त्यांनी अडवला. त्यात बर्फाच्या मोठ्या लाद्यांमध्ये मांसाचे तुकडे असल्याचे आढळून आले.
याबाबत  धनगर यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलीस गस्ती पथकातील हवालदार जाधव पोलीस शिपाई अमोल गुंजाळ यांनी घटनास्थळी येत सदर वाहनाचा ताबा घेतला. पोलिसांनी नासिर हुसेन गुलाम हुसेन मलिक (20) व अरबाज अब्दुल हमीद कुरेशी (19) दोघे राहणार कुर्ला,  मुंबई यांना ताब्यात घेतले.
जप्त केलेला टेम्पो पोलिस ठाण्यात आणल्यावर त्यातील मांसाचे वजन केले असता ते 3790 किलोग्रॅम इतके भरले. या मांस वाहतुकीबाबत कोणताही परवाना वरील दोघांकडे नव्हता.
पोलिसांनी रात्री उशिरा गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. आज या दोघांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गंगाराम सारूक्‍ते तपास करीत आहेत.
टेम्पोला बनावट नंबर ?
मांस वाहतूक करण्यात येणाऱ्या टेम्पोच्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली असता एमएच 08 हा पासिंग क्रमांक बनावट असल्याचे उघड झाले. मांस वाहतूक करणाऱ्यांनी एमएच 03 ऐवजी एमएच 08 या पासिंगची बनावट नंबर प्लेट वापरल्याचा प्रकार समोर आला
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!