Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाडमध्ये दरोडेखोरांची टोळी जेरबंद

Share

मनमाड | वार्ताहर

येथील मुरलीधर नगर भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला शिताफीने पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सर्व संशयित सराईत गुन्ह्रेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून त्यांच्यावर घरफोडी, जबरी चोरी व दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. याप्रकरणी चारही संशयितांच्या विरोधात विविध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी दिली.

शहरातील मुरलीधर नगर भागात एक टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पाटील, जांभळे, पोलीस हवालदार शेख, वणवे, जाधव, सुनील पवार आदीच्या पथकाने सापळा रचून शिताफीने या आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तलवारी चॉपरसह इतर हत्यारे व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम चुनियन, दिनेश पगारे, रोशन सातभाई आणि राहुल सदे (सर्व रा,मनमाड) अशी या संशयितांची नावे आहेत.

त्यांच्याविरुद्ध भादवी ३९९ ,४०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या टोळीच्या मागावर होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!