Video : म्हेळुस्केत चार एकर ऊस जळून खाक

0

म्हेळुस्के (गोरख जोपळे) |

दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के येथील सचिन माधवराव बर्डे यांच्या मालकीच्या गट नं.41 या शेतात तोडनी योग्य असलेला 4 एकर ऊस विद्युतवाहक तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून जळून राख झाला.

वेगाने वारा वाहत असल्यामुळे तारांचे घर्षण झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने दिली. तोडणीवर आलेल्या उसाच्या शेतात ठिणगी पडल्याने आगीने काही क्षणातच संपूर्ण उसाच्या शेताला वेढले.

धुराचे आणि आगीचे लोट पसरल्याने आजूबाजूचे शेतकरी याठिकाणी जमले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. या आगीत 5 ते 6 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

LEAVE A REPLY

*