Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

युतीचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप नेते हायकमांडच्या भेटीला!

Share

मुंबई | प्रतिनिधी

भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रमुख नेते आज राष्ट्रीय अध्यक्षांसोबत चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचले. भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चेसाठी अमीत शहा २६ तारखेला मुंबईत येणार होते मात्र शरद पवार यांच्या इडीच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याने या महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते नवी दिल्लीत पोहोचले असल्याचे सांगण्यात येते.

भाजपने  त्यांच्या विद्यमान १३२ आणि सेनेने ६२ जागा लढवाव्या आणि आणि उर्वरित जागांपैकी ९४ जागा मध्ये ४० -४० जागा दोन्ही पक्षांनी वाटून घ्यावा तसेच १४ जागा मित्रपक्षांना सोडाव्या असा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेल्यांना जागा सोडायच्या असल्याने काही जागांच्या अदालबदलीचा मोठा विषय प्रलंबित असून त्याबाबत अंतिम निर्णय येत्या दोन् दिसवांत घेतला जाणार असून त्या नुसार भाजपच्या असलेल्या जागेवर सेनेचा तर सेनेच्या असलेल्या जागेवर भाजपाचे असे ३२ जागांचे अदलाबदल करण्याबाबत महत्वाची चर्चा असल्याचे सूत्रानी सांगितले या चर्चा झाल्यानंतर येत्या रविवार पर्यंत युती झाल्याची घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याचे तर काही जागांवर मैत्रिपूर्ण लढतीचीही शक्यता असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!