ञ्यंबकेश्वरच्या आठवडे बाजारात आरोग्यदायी रानभाज्या दाखल

1

ञ्यंबकेश्वर (विशेष प्रतिनिधी) ता. १३ : रासायनिक खते आणि किटकनाशके यांनी मुक्त असलेला आरोग्यदायी भाजीपाला आज येथील मंगळवारच्या बाजारात दाखल झाला आहे.

पावसाला सुरुवात होत असतानाच दाखल झालेला हा रानमेवा घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडताना दिसते.

पावसाला सुरूवात होताच त्र्यंबकेश्वर परिसरातील आदिवासी भागात रानोमाळ या भाज्या उगवतात. आदिवासी महिला-बांधव भल्या पहाटे जाऊन त्या खुडतात आणि बाजारात घेऊन येतात.

चवीने खाणारे आणि या रानभाज्यांचे पोषणमूल्य ग्राहक या भाज्यांच्या प्रतिक्षेत असतात. ते आवर्जून हा भाजीपाला खरेदी करतात. अवघ्या दहा ते २० रूपयात जीवनसत्वसमृद्ध निसर्गठेवा त्यांच्या पदरात पडतो.

सध्या बाजारात व्रिकीस आलेल्या भाज्यांमध्ये चाई,कोळपा,बेंदुर, मोख अशा भाज्या दाखल झाल्या आहेत. लवकरच कौला, दिवा आदि भाज्या देखील दाखल होतील.

या भाज्या खाल्ल्याने पुढे आजार होत नाहीत, तसेच हातपाय दुखत नाहीत,एकूणच आरोग्य निरोगी राहते, असे सांगितले जाते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*