Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : चाऱ्याअभावी दुग्धव्यवसाय संंकटात; भाव कमी त्यात जनावरांचे दूधही आटले

Share

बेलगाव कुऱ्हे : लक्ष्मण सोनवणे

इगतपुरी तालुक्यातील शेतकरी शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात लावलेले मका, बाजरीचे पिक हातातून गेले.

मुक्या जनावरांना चारा तर दूरच साधे पाणीदेखील वेळेवर प्यायला मिळत नाही. उन्हाच्या तापमानाने मका या पिकाचा अक्षरश: पालापाचोळा झाला.

दुष्काळापुढे हतबल असलेल्या शेतकऱ्याना दुधधंद्याचा मोठा आधार होता आता चारयाअभावी तोही आता संकटात सापडला आहे. आधीच शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला बाजारभाव मिळत नाही अशातच जनावरांचे दुध आटले आहे. यामुळे दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे.

तालुक्याच्या पूर्वभागातील युवकांना अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवून देखील काम मिळत नसल्याने ते या व्यवसायात उतरले आहेत. मात्र, त्यांची निराशा होत आहे. बहुतांश शेतकरी पशुधन वाचविण्यासाठी आपल्या जीवाचे रान करीत आहेत.

चारा व पशुखाद्यांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकरी चारा विकत आणतात. अनेकजण दुसरीकडे रोजनदारी करून मिळालेली मजुरी जनावरांच्या चाऱ्यासाठी खर्च करीत आहे. इगतपुरी तालुक्यातील दुधधंद्याला आता घरघर लागली असून उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न याचे सूत्रच बसत नसल्याने लाख मोलाच्या दुधाळ जनावरांचा सांभाळ करायचा कसा?

या प्रश्नांने दुग्धव्यवसायिक शेतकरी धास्तावला आहे. इगतपुरी तालुका पावसाचे आगार समजले जाते सर्वच गावे दुष्काळाने होरपळत आहे. शेतीतील उभ्या मका पिकाचा पार पालापाचोळा झाला आहे. हिरवा चारा मिळत नसल्याने जनावरे दूध देखील कमी देत आहे.

मूठभर मक्याची पेंढी 20 ते 30 रुपयाला, गाईची वैरण दीडशे रुपये, वाळलेली पेंढी पंचवीस ते तीस रुपये तर जनावरांचे खाद्याचे ढेपीचे साठ किलोचे पोते सतराशे ते दोन हजार रुपयाला मिळते. तालुक्यात दुधाला भाव 6 रुपये फॅट दराप्रमाणे 35 ते 36 रुपये मिळतो यामुळे होत असलेला चाऱ्याचा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याने दुग्धव्यवसाय आता शेवटची घटका मोजत आहे.

हिरवा चारा दुधाळ जनावरांना पोटभर मिळत नसल्याने जनावरे दूध फारच कमी देत आहे. त्यामुळे दुधाची घटती संख्या चिंताजक बनत चालली आहे. आदी कारणांमुळे तालुक्यातील दुधव्यवसाय समस्याच्या गर्तेत सापडला आहे. तालुक्याच्या सर्व महसुली गावांमध्ये शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय केला जातो मात्र भीषण दुष्काळात आधार असलेला दुधाचा व्यवसाय चाऱ्याआभावी मोडकळीस आला असल्याने जनावरे कवडीमोल भावात विकनेच शेतकऱ्याच्या नशिबी आहे.

तालुक्यातील बऱ्याच युवकांनी बँकेच्या कर्जाद्वारे दुधव्यवसाय सुरु केले मात्र दुग्धव्यवसायिक आता आर्थिक संकटात सापडले आहेत.


तालुक्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात दूध धंदा केला जातो. तरूनपिढीने राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून लाखो रुपये कर्ज काढून हा व्यवसाय सुरु केला तोच जर कोलमडून पडला तर कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पशुखाद्य व चारा याचा हिशोब केल्यास दूध धंद्यात कष्ट अधिक आहे जनावरांचा खर्च निघत नाही. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

कचरू गुळवे, पशुपालक बेलगाव कुऱ्हे


तालुक्यातील टाकेद सर्कलसह इतर भागात देखील चारा टंचाई आहे. चारा छावणी असावी यासाठी प्रशासकीय मान्यता आहे. मात्र चारा छावणीबाबत शासनाच्या अटी, शर्ती जाचक असल्याने पशुपालक तयार नाहीत. शासनाने सर्व अटी शिथिल कराव्यात. दोन महिन्यांच्या आत जर छावण्या झाल्या तरच उपयोग होईल.

राजाभाऊ वाजे, आमदार सिन्नर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!