Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर @८८ टक्के; विसर्ग घटला, नदीकाठी घाणीचे साम्राज्य

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये पावसाने उघडीप दिल्यानंतर गंगापूर धरणातून विसर्ग घटविण्यात आला आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गंगापूरमध्ये ८८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गंगापूर धरणातून ८९७३ क्युसेकने पाणी गोदावरीत प्रवाहित केले जात आहे. घटलेल्या विसर्गामुळे गोदावरीची पाणीपातळी घटली असून पूरपरिस्थिती ओसरली आहे. नदीकाठी गाळ आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पूर ओसरला; गोदामाई पूर्वपदावर, नदीकाठी घाण आणि चिखलाचे साम्राज्य

Deshdoot यांनी वर पोस्ट केले सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

सकाळी पुराचे पाणी नारोशंकराच्या घंटेखाली उतरले होते. तर आज मंगळवारी गोदावरीच्या पुराचे परिमाण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीचे दोन दिवसांनी नाशिककरांना दर्शन झाले.

रामवाडी पूल वाहतुकीसाठी खुला झाला, तर रामसेतू आणि गाडगे महाराज पुलदेखील वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, याठिकाणी घाण आणि गाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर पुलावरून नदी ओलांडण्यास अनेकांनी पसंती दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!