Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वाहतूक पोलिसांनी पाच लाखांचा अवैध गुटखा पकडला; पेठ येथील एकाला अटक  

Share
पंचवटी | वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकात शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजेच्या सुमाराला वाहतूक शाखेचे कर्मचारी कर्तव्यावर असताना एका वाहन संशयितरित्या जाताना आढळून आल्याने त्यांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात  सुमारे २५ गोण्या अवैध गुटखा आणि तंबाखू मिळून आला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखा युनिट १ च्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून यात पेठ येथील संशयित शंकर येवला (३१) याला ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पंचवटी शहर वाहतूक शाखेचे झेब्रा पथक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी गणेश माळवाल, राजेंद्र जाधव, अनंत गारे, अमोल काळे आदी मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौक परिसरात गस्त घालत असताना त्यांना  आडगाव कडून एक महिंद्रा मार्शल (एमएच १५ आर ३७७५) येताना दिसली.
संबधित चारचाकी वाहना बाबत वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा संशय आल्याने पोलिसांनी संबधित वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनचालक येवला याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटखा आढऴून आल्याने पोलिसांनी येवलासह चार चाकी वाहन व गुटखा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी सदर घटनेबाबत दुपारी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देत पंचनामा केला असता २५ गोण्यामध्ये सुमारे ४ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखू मिळून आला आहे. या बाबत आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!