Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

खुशखबर : शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्याला पाच कोटी

Share

नाशिक । प्रतिनिधी 

ऐतिहासिक व संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेल्या नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार असून त्यात जिल्ह्याचे वैभव नागरिकांसमोर मांडले जाणार आहे. हा उपक्रम साजरा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

नाशिकला रामायण काळापासून ते अगदी सातवाहन राजवटीपर्यंतच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात. शिवाय, जिल्ह्याला ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक असा अनमोल ठेवा लाभला आहे.

या सर्व घडामोडींचे कॉफीटेबल बुक तयार केले जाणार आहे. एरियल फोटोग्राफीद्वारे जिल्ह्यातील महत्वाच्या स्थळांचे ड्रोनद्वारे छायाचित्रे काढली जाणार असून त्याचा समावेश कॉफीटेबल बुकमध्ये केला जाणार आहे.

शिवाय, खाद्यसंस्कृती, गडकिल्ले, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक स्थळे यांची माहिती देणारे उपक्रम राबविले जाणार आहेत. शहरातील व जिल्ह्याची जाण असलेल्या व्यक्तींचा समावेश करून या उपक्रमाची रूपरेष तयार करण्याचे काम सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!