Thursday, April 25, 2024
Homeनाशिकधक्कादायक : मालेगावमध्ये १० दिवसांच्या चिमुरडीला करोना; विंचूरमध्येही ०५ दिवसांच्या बाळाला लागण;...

धक्कादायक : मालेगावमध्ये १० दिवसांच्या चिमुरडीला करोना; विंचूरमध्येही ०५ दिवसांच्या बाळाला लागण; रुग्णसंख्या ६८९ वर

दिंडोरीतील मोहाडी, निळवंडीत आढळले रुग्ण मालेगावी १६ पॉझिटीव्ह;

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज सायंकाळी सात वाजेपर्यंत एकूण एकूण १६ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर एका मालेगाव येथील करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण मालेगांव येथिल रहिवासी असून काल रात्री जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याचा मृत्यु झाला असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी सांगितले. दुर्दैवाने मालेगावातील चंदनपुरी येथील दहा दिवसांच्या चिमुरडीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर लासलगाव विंचूर येथील एका पाच दिवसांच्या मुलालाही करोनाची बाधा झाल्याचे आज समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन यंत्रणेसह जनतेची धाकधूक वाढली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होण्यास सुरूवात झाली असून आज विविध नव्या गावांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आज जिल्ह्यात नव्याने १६ रूग्णांची भर पडली आहे.

यामुळे जिल्ह्याचा आकडा ६८९ वर पोहोचला आहे. आज एका मालेगावातील करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहे. यामध्ये नाशिक शहरातील दोघांचा समावेश आहे.

दुसरीकडे आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडे रोडयेथील पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली आहे. तर मोहाडी येथील एक रुग्ण करोना बाधित आढळून आली आहे.

मालेगावीकाल सहा मृत रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा एक रुग्ण दगावला आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिक ग्रामीणमध्ये ८२ रुग्ण बाधित आहेत. तसेच नाशिक मनपा क्षेत्रात एकूण ३९ रुग्ण बाधित असून यातील १२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

तसेच मालेगाव मनपा क्षेत्रात ५४७ रुग्ण बाधित आहेत. यामध्ये ५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत मालेगावी २९ मृत्यू झाले आहेत.

* एकूण कोरोना बाधित: ६८९
* मालेगाव : ५४७
* नाशिक : ३९
* एकूण मृत्यू: ३१
* कोरोनमुक्त : ७०
* उर्वरित जिल्हा : ७६

- Advertisment -

ताज्या बातम्या