Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पोलीस कर्मचाऱ्याने झाडली सावत्र मुलांवर गोळी; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Share

पंचवटी | प्रतिनिधी 

शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सावत्र मुलांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला. घरगुती करणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


अधिक माहिती अशी की, पेठरोडवरील अश्वमेध नगर येथे राजमंदिर इमारतीत उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय अंबादास भोये यांच्यात आणि मुलांमध्ये  भांडण झाले.

मयत शुभम चिखलकर

मयत सोनू चिखलकर

भांडण इतके विकोपाला गेले की, वडिलांनी सावत्र मुलांवर गोळीबार करत सर्व्हिस रिव्होल्वरने तीन गोळ्या झाडल्या. मुले बाथरूममध्ये जाऊन लपली असताना हा गोळीबार झाला. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.

सोनू नंदकिशोर चिखलकर (वय २५) , शुभम नंदकिशोर चिखलकर (वय २२) असे दोन्ही मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.  प्राप्त माहितीनुसार, मयत सोनू चिखलकर हा नौदलात कार्यरत होता. तर शुभम नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते.

 

 

 

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आधीच गुन्हेगारीच्या कचाट्यात सापडलेल्या नाशिक शहरात पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडून सावत्र मुलांचा जीव घेतल्याने पुन्हा एकदा नाशिक प्रकाशझोतात आले आहे.

अश्वमेध नगरमधील याच बिल्डींगमध्ये घडली घटना

रुग्णालयात आईचा हंबरडा

मला कोणाशीच काही बोलायचे नाही. मला फक्त साहेबांना भेटायचे आहे. मला माझा पोरगा परत दे अशा शब्दांत मुलांच्या आईने जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!