Video : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक

0

नाशिक | प्रतिनिधी

वडाळागावातील सावित्रीबाई झोपड़पट्टीला लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने प्रसंगावधान राखत रहिवासी घराबाहेर पडल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान, परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरल्याने याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आजूबाजूच्या घरांच्या गच्चीवर चढून अनेकांनी जीव धोक्यात घालून आग बघण्यासाठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

*