Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

टँकर देयकांसाठी 15 कोटींचा प्रस्ताव

Share

नाशिक । प्रतिनिधी

ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी 378 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या देयकापोटी आतापर्यंत एक कोटी 15 लाख रुपये खर्च झाले आहेत.

जिल्हा परिषदेने टंचाई उपाय योजनांसाठी 15 कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. ग्रामीण भागाची तहान भागविण्याची सर्व मदार ही टँकरवर आहे. जिल्ह्यातील 270 गावे व 917 वाड्यांमध्ये पिण्याचे पाण्याचे तीव्र संकट असून या ठिकाणी 378 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसाला 850 टँकरच्या फेर्‍या सुरू आहेत.

गावांसाठी व टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी 218 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. नांदगाव, येवला, सिन्नर व मालेगाव या तालुक्यांमध्ये टँकरने अर्धशतक पार केले आहे.

कधी नव्हे ते यंदाच्या वर्षी पहिल्यांदा टँकरने साडेतीनशेचा आकडा गाठला. टँकरचे प्रस्ताव हे जिल्हा परिषदेकडून प्रशासनाला दिले जातात. टँकर फेर्‍यांपोटी जिल्हा परिषदेने आतापर्यंत एक कोटी 15 लाख रुपयांचे देयके अदा केली आहेत.

जिल्हा परिषदेने टँकर व इतर टंचाई योजनांसाठी 15 कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!