Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

धक्कादायक! दुध संकलन केंद्रात भेसळीचा संशय; सिन्नर तालुक्यात खळबळ

Share

नाशिक | प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील उजनी येथील दुध संकलन केंद्रावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लॅक्टोस पावडरच्या ४५ पेक्षा अधिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अन्न आणि औषध विभागाने पावडरचे नमुने घेतले असून अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक माहिती समोरे येईल. पावडर शरीराला अपायकारक जरी नसली तरी दुधात भेसळ केली जात होती का याबाबत तपास सुरु आहे.

अधिकक माहिती अशी की, उजनी गावात हेमंत पवार (रा. उजनी ता. सिन्नर) यांचे दुध संकलन केंद्र आहे. त्यांच्या केंद्रातून येणाऱ्या  दुधात भेसळ केली जात असल्याची तक्रार सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिळाली होती.

त्यानुसार चौकशी व खातरजमा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक लावने यांच्यासह सहकाऱ्यांनी सकाळी साडेआठ वाजता पवार याच्या दुध संकलन केंद्रावर छापा टाकला. यामध्ये त्यांना दोन वेगवेगळ्या कंपनीच्या पिशव्या मिळून आल्या.

पिशव्यांमध्ये २५ किलो वजनाची १ पिशवी अशा  ४५ पिशव्या मिळून आल्या असून या पिशव्यांवर दोन हजार रुपये किंमत लिहिलेली आहे. लॅक्टोस पावडरच्या या पिशव्या असल्याचे समजते.

ही पावडर कशासाठी आणली याबाबत पवार याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पडिले हेदेखील घटनास्थळी पोहोचले. आढळून आलेल्या पावडरचा साठा शरीरास अपायकारक आहे किंवा नाही.

किंवा तिचा दुधात भेसळ करण्यासाठी वापर होतो किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी पडिले यांनी अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या विभागाचे निरीक्षक खेडकर यांनी उजनी येथे येत सदर पावडर मानवी शरीरास अपायकारक नसल्याचे सांगितले.

मात्र, या पावडरचा वापर करून दुधात भेसळ करण्यात आल्याचे पुरावे न मिळाल्याने याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यास खेडकर यांनी नकार दिला. सदर पिशव्यांतील पावडरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत उर्वरित साठा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!