Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

बागलाण तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Share

नाशिक | प्रतिनिधी 

बागलाण तालुक्यातील गोराणे येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर उत्तम देसले (वय २५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असल्याचे समजते.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे दुष्काळ होता. यामुळे हातउसणवार पैशांनी कर्जाचा डोंगर या शेतकऱ्यावर उभा होता.  यंदाही पावसाळा सुरु होऊन सव्वा महिना लोटला तरीही पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे देसले आर्थिक विवंचनेत होते.

परिसरात अद्याप पेरण्या झाल्या नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!