…आता आली व्यापाऱ्यांची बारी; शेतकऱी संपाचा व्यापाऱ्यांना फटका

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. १ : कमी बाजारभाव देण्यासह विविध कारणांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या फळ आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना आज संपकरी शेतकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला.

प्रशासनाने तैनात केलेल्या पोलिसांच्या लाठ्या झेलत शेतकऱ्यांनी भाजी व्यापाऱ्यांच्या गाड्या अडविल्याने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आजच्या आंदोलनात दिसून आले. त्यामुळे शेतकरी संपाचा गैरफायदा उठवत साठवलेल्या मालातून पैसे कमविण्याचे स्वप्न शेतकऱ्यांनी धूळीस मिळविले.

जानोरी, ता. दिंडोरी येथे विमानतळावर आंबे घेऊन जाणारी आयशर गाडी शेतकऱ्यांनी अडविल्यानंतर चालक माघारी फिरला मात्र त्यानंतर चालक बदलून गाडी पुन्हा रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यानी चांगलाच धडा शिकविला.

शिंदे, कंदर आणि संगमनेर येथे दुधाच्या पिशव्या आणि दूध रस्त्यावर टाकण्यात आले. वणी पिंपळगाव रस्त्यावर शेतमालाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू गाड्‌यांची शेतकऱ्यांनी तपासणी केली.

काल शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे चढे भाव लावून सामान्यांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांनी आज शेतकरी आंदोलनाचा धसका घेतल्याचे दिसत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या धसक्याने व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला भाजीपाला बाहेर काढलाच नाही.

दरम्यान पुढील आठ दिवस हे आंदोलन सुरू राहणार असून त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे एरवी संधीचा फायदा घेणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठी चपराक बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*