Photo gallery : नाशिक शहरात बंदला समिश्र प्रतिसाद

0

नाशिक, ता  ५ : नाशिक शहरात आजच्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जुने नाशिक, भद्रकाली परिसरातील रमजानमुळे दुकाने सुरू होती.

मेनरोडची दुकानेही सकाळी सुरू होती. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला आवाहन करत मोर्चा काढल्याने काही काळ दुकाने बंद झाली. मात्र नंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चा काढून सरकारविरोधी घोषणा दिल्या.

दरम्यान नाशिक शहरात बंदच्या काळात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

(छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत)

LEAVE A REPLY

*