Video : संप मोडण्यासाठी प्रशासनाचे कठोर पाऊल; शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

0

नैताळे : निफाड तालुक्यातील नैताळे, गाजरवाडी, रामपुर, सोनेवाडीमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण लागले आहे. येथील शेतकऱ्यांनी नाशिक -औरंगाबाद महामार्गावर शेती मालाच्या ट्रक, टेम्पो अडवून कांदा, डाळींब, आंबे रस्त्यावर ओतले होते.

त्यानंतर शेतकऱ्यांचा आक्रोश बघता पोलिसांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते त्यावेळी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला. जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगड फेकले त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. तर ताब्यात
पोलिसांचा जमावावर लाठीचार तर जमावांचाही पोलिसांवर दगडफेक

आंदोलन करणारे पाच जन पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांशी संपर्क होत नसल्याचीही चर्चा परिसरात होती.

दरम्यान, कालच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी वेळ पडल्यास आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची संप मोडून काढण्याची सज्जता दिसून येत आहे.

 

LEAVE A REPLY

*