Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेशची महाराष्ट्र संघात निवड; विजय मर्चंट चषक खेळणार

Share
नाशिक । प्रतिनिधी 
सिन्नरच्या उदयोन्मुख क्रिकेटपटू ऋषिकेश कातकाडे याची १६ वर्षाखालील मुलांच्या महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्याच्या रूपाने संघाला जलदगती गोलंदाज मिळाला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने उद्या दि.११ पासून पुण्यात खेळवल्या जाणाऱ्या विजय मर्चंट चषकासाठी तो नाशिकचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मूळचा सिन्नर तालुक्यातील जायगावचा रहिवासी असणाऱ्या ऋषिकेशने सातवीत शिकत असताना गेल्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे. उजव्या हाताने जलद गोलंदाजी करताना त्याने सुरुवातीपासूनच आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. जायगाव येथीलच एसएसके महाविद्यालयात ११ वीत शिकणाऱ्या ऋषिकेशने सुरुवातीची दोन वर्षे सिन्नर क्रिकेट क्लबच्या कानडीमळा येथील क्रीडांगणावर प्रशिक्षक शिवाजी जाधव यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले.
तर दोन वर्षांपासून नाशिक येथे शेखर घोष यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत होता.  संकेत पांडे, सिद्धार्थ नक्का यांच्या पाठोपाठ ऋषिकेशने देखील १६ वर्षाखालील मुलांच्या राज्य संघात प्रवेश मिळवला होता. यापूर्वीचे दोन्ही खेळाडूं संभाव्य संघात निवडले गेले होते तर ऋशिकेशने मात्र त्यांच्यावर मात करत थेट अंतिम संघात गेल्यावर्षीच आपले स्थान निश्चित केले होते.३ सामन्यात १५ बळी असे त्याचे गोलंदाजीतील योगदान राहिले होते.
मात्र त्यावेळी आजपणामुळे निवड होऊनही तो खेळण्यासाठी जाऊ शकला नव्हता. यंदा महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनें त्यांच्याकडील नोंदणीकृत असलेल्या ५६ क्रिकेट क्लबची आमंत्रितांची स्पर्धा बोलावली होती. यात नाशिककडून ऋषिकेशने प्रतिनिधित्व केले. उद्या दि.११ पासून पुणे क्लबच्या मैदानावर विजय मर्चंट चषकासाठी तो महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे.
ऋषिकेश सोबतच सिन्नरच्या असणाऱ्या माया सोनवणे व प्रियंका घोडके यादेखील रणजी करंडकासाठी पुन्हा महाराष्ट्र महिला संघात निवड होण्याच्या मार्गावर आहेत. त्याची निवड झाली असली तरी अद्याप संघाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुणे येथे सराव शिबिरात त्या दोघी सहभागी झाल्या असून दोन दिवसात संघ निवडीची घोषणा केली जाणार आहे.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी 
१६ वर्षाखालील मुलांच्या महाराष्ट्र संघात निवड झालेल्या ऋषिकेशची कौटुंबिक परिस्थिती बघितली तर तो सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. घरात खेळाचा कोणताही वारसा नसला तरी त्याची खेळाची आवड ओळखून वडिलांनी त्याला सिन्नरला जाधव यांच्याकडे पाठवले. सध्या तो नाशिकला मावशीकडे राहून घोष यांच्या निगराणीखाली क्रिकेटमधील बारकावे आत्मसात करीत आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!