Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; हस्तेदुमाला येथील घटना

Share

दिंडोरी | प्रतिनिधी 

दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विष्णू राऊत (वय ४०) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार या शेतकऱ्यावर सोसायटीचे सात लाखांचे कर्ज असल्याचे समजते.

परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे राऊत आर्थिक विवंचनेत होते. आज सकाळी त्यांनी राहत्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीमागे कुटुंब आहे, या कुटुंबाला शासकीय मदत प्राप्त व्हावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कोंद यांनी केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाहीयेत त्यामुळे यासाठी कर्जमाफी, वीजबिल माफ करून पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!