Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आमदारांकडून ‘या’ आहेत तरुणाईच्या अपेक्षा; जाणून घ्या सविस्तर

Share

नाशिक | शिवानी लोहगावकर

आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दुर्बल असलेले घटक या आधीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्याचे मुद्दे होते. मात्र,  अलिकडच्या काळात सुशिक्षित बेरोजगार हा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला आहे. यापार्श्वभूमीवर निवडून येणारा नेता खऱ्या अर्थाने जबाबदारी पेलवणारा असावा. आर्थिक मंदी आणि बेरोजगारी हे मुद्दे निवडणूक लढवून नेण्याचे शास्त्र झाले आहेत. केवळ निवडणुका जवळ आल्या की, नेत्यांना रोजगार आणि आणि त्या साठी योजना आठवत असतात निवडणूक झाली की, निवडून आलेल्या नेत्यांकडून या योजनांकडे दुर्लक्ष होते.

नाशिक सारख्या शहरात औद्योगिक प्रगती साठी पोषक वातावरण आहे. तसेच रोजगाराच्या सुविधांची गरज देखील आहे, पण केवळ कनेक्टिव्हिटी चा प्रॉब्लेम असल्याने नवीन इंडिस्ट्री उभ्या करता येत नाहीयेत. या उलट जे जुने उद्योग आहेत, तेच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत हा नेत्याने खरोखर लक्ष केंद्रित करण्यासारखा मुद्दा आहे. रस्त्यांचा देखील विकास हवा तसा होत नसल्याने नवीन उद्योग सुरू होण्यास त्रास होतो आहे असा सूर नाशिकमधील काही सुशिक्षित तरुणांनी बोलून दाखवला आहे.


येत्या निवडणुकांत मतदारांपुढे मतदान करण्यापूर्वी काही मुद्दे आहेत जे लक्षात घेऊन मगच योग्य त्या उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे. आज शेअर मार्केटची स्थिती बघता मंदी आहे वगैरे अश्या मोठ्या गोष्टी रोज कानी पडत आहेत. पण, आज ज्या निवडणुकीसाठी आपण मतदान करत आहोत त्याचा संबंध खरंच या मंदिशी आहे का ,हे विचार करण्याची गरज आहे. बेरोजगारी हा मुद्दा आहे पण येत्या निवडणुकीत निवडून येणारा आमदार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल का, हे लक्षात घेतले पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारांनी ज्या योजना मांडल्या आहेत त्या आपल्या पर्यंत आज पूर्णपणे पोहोचत नाही. जो उमेदवार हे प्रभावीपणे सर्व करू शकतो त्यालाच मतदान करणे महत्वाचे ठरेल. मंदी आजतरी पूर्णपणे इफेकटिव्ह नाहीये पण हे असेच सुरू राहिले तर पुढे मात्र नक्की मंदी चे घाव सोसावे लागतील. येत्या पंचवार्षिक साठी पून्हा हेच सरकार आणणे गरजेचे आहे.

चंद्रशेखर दीक्षित 


ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्ष काही काम करत नाहीत असे कारण सांगून पक्षांतर करणे चुकीचे आहे, मुळात नेताच काम करणारा असला तर तो कोणत्याही पक्षातून विकास साधू शकतो. बेरोजगारी बद्दल अनेक वेळा केवळ बोललेच जाते, मात्र त्यावर फारसे काम केलेले दिसत नाही. आपल्याकडे अनेक कौशल्यप्रगत युवक ग्रामीण भागात देखील आहेत. मात्र ग्रामीण बेरोजगारी कडे लक्षच दिले जात नाही त्यामुळे त्यांच्या कौशल्यांकडे दुर्लक्ष होते यासाठी ग्रामीण भागात उद्योग स्थापन करून रोजगार निर्मिती करावी व ग्रामीण युवकांना न्याय द्यावा.

अक्षता जीवन नाईकवाडी


सध्याची आर्थिक परिस्थिती आणि चालु असलेली मंदी बघता हा खरच 1 चिंतेचा विषय आहे. आता विधान सभेत निवडून येणाऱ्या उमेदवारा कडून एवढीच अपेक्षा आहे की, आर्थिक दुर्बल लोकांना नोकरीत आरक्षण मिळावे व देशाची आर्थिक परिस्थिती जास्तीत जास्त उत्तम राहावी अशीच अपेक्षा आहे.

कौशल घोडके


निवडून येणारे आमदार शहराची खऱ्या अर्थाने जबाबदारी घेणारे असावेत. सध्याच्या मंदीच्या वातावरणात रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधींचा मतदारसंघातील प्रश्नांचा सखोल अभ्यास असणे अपेक्षित आहे.

प्राजक्ता नागपुरे


लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असतात, जनतेच्या साध्या अपेक्षा असतात की, कामाला जातो ते रस्ते तरी खड्यांचे नसावेत, त्याची कमतरता पूर्ण झाली पाहिजे. स्वच्छता सर्व ठिकाणी असायला हवी. पिण्याचे पाणी असो किंवा नदी असो. घनकचराचे व्यवस्थित विल्हेवाट लावली गेली पाहिजे.

प्रियंका सरवार


आमदार यांनी तालुक्यातील रस्ते निट करावे विद्यार्थ्यासाठी आपल्या तालुक्यात चांगले उद्योग व्यवसाय कसे उभरता येतील यावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्याना चांगल्या दर्जाचे शिक्षण पध्दत द्यावी. विद्यार्थ्याना काँलेज वेळेत बस उपलब्ध करुन द्याव्यात. प्रत्येक तालुक्यात शालेय विद्यार्थ्यासाठी वसतीगृह असावे विद्यार्थ्याच्या मागण्याकडे लक्ष द्यावे शिक्षण पध्दत सुधरावी.

नवनाथ चकोर.(उपाध्यक्ष- ओबीसी फाऊंडेशन नाशिक ) जि.एम.डी.काँलेज सिन्नर


आज आपल्याकडे बरेच असे कलावंत आहेत, त्यांच्यात कलागुण तर आहेत पण सादर करण्यासाठी मंच उपलब्ध होत नाही. त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. विद्यार्थीसाठी बस वाहतूकीचे काम केले पाहिजे.

सुरज तिगोटे


नवनिर्वाचित आमदारांनी राजकारणापलिकडे जाऊन समाजहितासाठी काम करायला पाहिजे. बळिराजा कसा सुखावेल या गोष्टी डे ध्यान द्यायला पाहिजे. आज‌ प्रत्येक शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली ती कामे केली गेली पाहिजेत.

अवनीत सिंग चौहान


आज बऱ्याच युवकांना नोकरी नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. विद्यार्थीच्या विविध समस्या आहेत त्याची पूर्तता झाली पाहिजे.

प्रतिक पगारे


(संकलन : शिवानी लोहगावकर, सना शेख)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!