Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआत्मविश्वासाने करू संकटावर मात : विश्वास नांगरे पाटील

आत्मविश्वासाने करू संकटावर मात : विश्वास नांगरे पाटील

करोना हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकट आहे. त्याच्याशी लढा देताना प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. पोलीसही माणुस आहे. त्यालाही करोणाची भीती आहे. असे असतानाही तो तुमच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभा आहे. त्यांच्याच आधारावर आपण या सकंटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. नाशिककरांनी हे समजून सहकार्य केले. कौतुक केले तर यातूनच प्रेरणा मिळून अधिक भक्कम पणाने आपण या संकटावर मात करू असा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केला.

खंडू जगताप | नाशिक 

- Advertisement -

सध्याचे दैनंदिन कामाचे स्वरूप काय कसे आहे ?

सकाळी लवकर उठायचे, योगा प्राणायाम, व्यायाम वेळेवर नास्ता, सकाळी लवकरच कार्यालयात पोहचून दिवसभराचे नियोजन, वरिष्ठांचा पत्रव्यव्हार, अधिकार्‍यांची बैठक, आढावा, वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशांची अंमलबजावणी, सामाजिक अंतर पाळून भेटण्यासाठी आलेल्यांशी चर्चा, सायंकाळी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील काही भागात भेट देऊन पाहणी, अधिकारी, कर्मचार्‍यांना सुचना, जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा, बैठका रात्रीचे नियोजन, वॉकीटॉकीवरून आढावा, सुचना असे धावपळीची दैनंदिनी आहे.

येणार्‍या ताणावर कशी मात करता?

योग हे शरिर व मानला जोडत असते. आता शांती असल्याने अधिक चांगल्या प्रकारे योग होतो. यमन, यम, आसन, प्रत्यारना, ध्यान, समाधी अशा प्रत्येक अंगाची अनुभवती आपण घेतो. संगित ऐकतो, कुटुंबियांशी काम सोडून इतर गप्पा गोष्टी करतो यातून ताणावर मात करण्याचे कसब मी शिकलो आहे.

चिंतेचे वातावरण असताना सकारात्मक्ता कशी मिळवता?

आपण आपले विचार शुद्ध ठेवले की, सर्व काही सुरळीत होते, सर्व सकारात्मक होईल असा विश्वास वाटतो. सकारात्मकतेसाठी मी अधिकाधीक पुस्तके वाचतो. नेटवर पुस्तके ऐकायला मिळातात. संगित हे आत्म्याला आंनंद देणारे आहे. विविध वाद्य समजून घेतो. यातून आनंद मिळवतो. प्रत्येक संकटाला तोंड देत राहिले की त्याची सवय पडून जाते. मग संकट संकट वाटत नाही.

तुमचे कुटुंबिय, तुमची परिस्थिती कशी हाताळता?

आमचे घरचे सर्व लहान थोर एसीपी (अ‍ॅन्टी करोना पोलीस) झाले आहेत. मुलगी, पत्नी यांचे माझ्यावर बारीक लक्ष असते. यामुळे घरी आले की बाहेरच पहिले बूट काढावे लागतात, मग सॅनिटायझ व्हावे लागते. सर्व मोबाईल, चष्मा सॅनिटायझ करावे लागते. मग अंघोळ करून स्वच्छ व्हावे लागते. कुटुंबियांकडून विविध सुचना मिळतात. स्वतला स्वताची कामे करावी लागतात. यातून सर्वांची सुरक्षितता जपली जाते. ऐक नवा अनुभवही आपण घेत आहे.

तुम्हाला कोणाचा आधार वाटतो?

माझा प्रत्येक अधिकारी, प्रत्येक शिपाई स्वतचा जीव धोक्यात घालून रस्त्यांवर नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेतो आहे. यासह शहरात कोठेही कायदा स्ाुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, कोणतीही आणि काहीही घटना घडली तरी सर्वांना आठवतो तो पोलीसच, हाच पोलीस शिपाई ते अधिकारी हे माझे कणा असून प्रत्येक क्षणी त्यांचाच मोठा आधार असतो. त्यांच्याच जीवावर आम्ही प्रत्येक संकट परतवून लावू शकतो.

जबाबदारीचे भान, बदणारी परिस्थिती नियोजनाचा भार हे गणित कसे संभाळता?

करोनाचे संकट हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकट आहे. त्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांमध्ये भीती आहे, ताण आहे. सर्वाधिक ताण सरकारी यंत्रणेवर आहे. सर्व लोकांना घरात ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न, आमचे अधिकारी, कर्मचारी आठ ते दहा तास काम करतात. अनेक ठिकाणी काही घटनांमधून पोलीसां विषयी गैरसमज तयार होतात. यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. मानवी दृष्टीकोनातून पोलीसींग करण्याचे सांगितले जाते. चांगल्या कामाचे फळ चांगले मिळते यातून ताण नाहीसा होता.

सहकर्‍यांची, त्यांच्या कुटुृबियांची काळजी कशी हाताळता?

माझी सगळी यंत्रणा रस्त्यावर आहे. त्यांच्या काळजीतून मनावर ताण नक्कीच येतो. त्यांच्या आरोग्य व सुरक्षितेसाठी माझे अधिक प्रयत्न असून त्यांच्या सुरक्षेसाठी तीन तीन तासांची त्यांची कामाची वेळ ठरवून दिली आहे. त्यांना व्हिटामिन सी च्या गोळ्या, फळे, मास्क, सॅनिटायझर दिले जाते, त्यांच्यासाठी सॅनिटायझर व्हॅन तयार केल्या आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठीही सुरक्षा साधने पुरवली आहेत. अगदी त्यांचे वैयक्तीक प्रश्नही सोडवण्याचा आपला प्रयत्न असतो.

कामासाठी प्रेरणा कोठून मिळते?

काम हीच आपली प्रेरणा आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रेरणेची गरज नाही. आपण करत असलेले काम ते जबरदस्ती न समाजता त्यातून आनंद मिळवण्यासाठी केले तर काम हे काम राहत नाही, तर आपला छंद होतो. छंद कायम आनंदायी असतो. तोच आनंद आपल्या कामात मिळवला की तीच प्रेरणा पुढील कामाकडे खेचते.

कामासाठीची उर्जा व उत्सहाचे रहस्य काय?

व्यायाम, योग, प्राणायाम हे युट्यूब तसेच टिव्हीवर पाहूण वजन न घेता आपण व्यायाम करतो, पुर्ण शरिराचा वापर करून व्यायाम, पुलअप्स, पुशअप्स यावर अधिक भर. सायंकाळी पक्षांचे गुंजन ऐकतो, शांतपणे अंगणात झोपून रात्री आकाशातील चंद्र तारे यांचे निरिक्षण करून दिवसभराचा ताण तणाव विसरतो. यातूनच पुन्हा उद्याच्या लढण्यासठीची उर्जा प्राप्त होते. पुन्हा नव्या दिलाने, नव्या उत्सहाने कामाला लागतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या