Video : राज्य उत्पादन भरारी पथकाच्या कारवाईत १० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

नाशिक | आज त्र्यंबक जव्हार रस्त्यावरून पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून अवैध मद्यवाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार राज्य उत्पादनचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे,  अधिक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्र्यंबकेशवर-जव्हार रोडवरील अंबोली शिवारात सापळा रचुन वाहन तपासणी केली असता वाहनातून सुमारे दहा लाखांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरु आहे.

नाताळ व वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्यविक्रीवर आला बसावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सीमा भागात कारवाई केली जात आहे. भरारी पथकांच्या माध्यमांतून करडी नजर ठेवली जात आहे. आज केलेल्या कारवाईत संजय सोहनभाई गांधी व नोरतमल ओनाडजी साहु या दोघांना महाराष्ट्र दारुबंदी अधीनियम कलम
65 – (8) (९) 81,83,90 नुसार अटक करण्यात आली आहे.

फोटो /व्हिडीओ : सतीश देवगिरे, देशदूत डिजिटल

या कारवाईत दादरा नगर हवेली येथून विक्रीस आणलेल्या उच्च दर्जाच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

निरीक्षक एम.बी.चव्हाण, दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते, दुय्यम निरीक्षक देवदत्त एन.पोटे, जवान सर्वश्री कैलास कसबे, अमित गांगुर्ड, दिपिक आव्हाड, अमन तडवी, विठ्ठल हाके, धनराज पवार, रतिलाल पाटील, सोमनाथ भांगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*