Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमद्य दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी ‘राज्य उत्पादन’ची शक्कल

मद्य दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी ‘राज्य उत्पादन’ची शक्कल

file photo 

नाशिक | प्रतिनिधी 

- Advertisement -

राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य दुकाने सुरु करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. नाशिकमध्ये मद्याची दुकाने उघडण्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर हजारोंच्या संख्येने तळीराम रणरणत्या उन्हात उभेत राहून मद्य खरेदीसाठी दुकानांवर धडकले होते. शहरासह ग्रामीण भागात सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्यानंतर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभाग गर्दी टाळण्यासाठी टोकन किंवा कूपन पद्धतीने विक्री करण्याच्या तयारी दिसून येत आहे.

यामध्ये ग्राहकाला ठराविक चिट्ठी दिली जाईल. यामध्ये ग्राहकाने स्वत:चे नाव, मोबाईल नंबर, मद्याची मागणी इत्यादी गोष्टी एका कागदावर लिहून दुकानदाराला द्यावयाच्या आहेत. यानुसार दर तासाला ५० ग्राहकांना मद्य विक्री केले जाऊ शकते असा अंदाज राज्य उत्पादन विभागाने लावला आहे. दिवसभरातून एकूण ४०० नागरिकांना  मद्याची विक्री केली जाईल. आदल्या दिवशी ज्या ग्राहकांना मद्य मिळू शकले नाही त्यांना दुसऱ्या दिवशी देण्याची सोय करावी असेही राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक डॉ. मनोहर अन्चुळे यांनी सांगितले आहेत.

डॉ. अन्चुळे यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार, ग्राहकांना सदर मागणीपत्राचा नमुना दिल्यानंतर त्यांना टोकन क्रमांक देण्यात यावा. जर टोकन उपलब्ध नसतील तर को-या कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दुरध्वनी क्रमांक देऊन त्यावर अनुक्रमांक द्यावा. तो अनुक्रमांक ग्राहकाला दिलेल्या अनुक्रमांकाचाच असावा.

साधारणपणे अशा ५० ग्राहकांना सेवा एका तासात  दिली जावू शकते. तद्नंतर दुस-या तासात ५१ ते १०० क्रमांक असे ८ तासात जास्तीत जास्त ४०० लोकांना सेवा दिली जावू शकते हे स्पष्ट होईल.

त्यामुळे ४०० च्या पुढे येणा-या ग्राहकांना दुस-या दिवशी सेवा देण्यात येईल, हे स्पष्टपणे सांगावे म्हणजे गर्दी नियंत्रीत होईल. या शिवाय दुकानाच्या अगदी जवळ कोणतही विशिष्ट वेळी ५ पेक्षा जास्त ग्राहक उभे राहणार नाहीत याची पुरेपुर दक्षता घ्यावी.

दुकानदाराने दर १५ मिनीटानंतर अथवा आवश्यकतेनुसार कोणत्या ग्राहकाचा टोकन क्रमांकाची सर्व्हिस चालु आहे ते बोर्डावर नमुद करावे. यातून गर्दी कमी होण्यास मदत होईल.

तसेच ग्राहकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे यासाठी  सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. विभागातील निरीक्षक / दुय्यम निरीक्षक यांना झोनल ऑपिसर म्हणुन विशिष्ट भागासाठी तात्काळ नेमावे. तसेच भरारी पथकातील अधिका-यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दीच्या एफएल-२ अनुज्ञप्तीच्या ठिकाणी वारंवार भेटी देवुन सामाजिक अंतराचे पालन होण्याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहक करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या