Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माजी महापौर अशोक मुर्तडक यांची नाशिक पूर्वमधून माघार; सानप विरुद्ध ढिकले सरळ लढत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक पूर्वमधून मनसेनेचे उमेदवार आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे. यामुळे नाशिक पूर्वमध्ये आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे.

नाशिक पूर्वची जागा आघाडीने कवाडे रिपाइं गटाला सोडली आहे. मात्र, ऐनवेळी भाजपाने तिकीट कापल्याने बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला. सानप यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला; तर कवाडे गटाकडून गणेश उन्हवणे यांनी अर्ज दाखल केला आहे.  त्यामुळे मुर्तडक यांनी माघार घेतल्याने येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब सानप यांच्यातच दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

माघारीबाबत मुर्तडक म्हणाले की, विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याची कुठलीही तयारी नसताना मला माझ्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. साहेबांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरला मात्र, आज माघारीचा दिवस असल्याने आपण पक्षाच्या उमेवारास निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून पूर्व मतदार संघातून माघार घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकारी बैठक पार पडली. यादरम्यान हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस महा आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा देण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. मात्र, मुर्तडक यांनी पाठींब्याविषयी कुठलीही माहिती माध्यमांना दिलेली नाही.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!