Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळांसह आठ आमदार सेनेत प्रवेश करणार?

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राज्यातील ८ आमदारांसह सेनेत डेरेदाखल होणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. भुजबळांचे निकटवर्तीय तसेच शिवसेनेचे नेते आणि  कार्यकर्त्यांमध्ये भुजबळांच्या सेनाप्रवेशाबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

विशेष म्हणजे भुजबळ यांच्यासोबत राज्यातील आठ आमदारदेखील प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील प्रवेशावर गेल्या अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात आहेत. भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख तसेच नाशिकमधील शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाची जाणीव करून देत भुजबळांना सेनेत प्रवेश देऊ नये असे नाशिकमधील मातोश्रीवर गेलेल्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. नेत्यांच्या आवाहनाला ठाकरे यांनीही याबाबत जाणीव असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर असताना भुजबळ अनुपस्थितीत होते. त्यामुळे भुजबळांच्या अनुपस्थितीचे कोलीतच मिळाल्याने राजकीय चर्चांमध्ये एका विषयाची यानिमित्ताने भर पडलेली दिसून आली.

खा. सुळे नाशिक दौऱ्यावर आल्या असता यांना एका पत्रकाराने भूजबळांच्या सेना प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्यांनी प्रत्येकाला स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सूचक व्यक्तव्य केले.

भुजबळांनी राजकीय वाटचालीत पक्ष संघटनाबरोबरच इतर मागास वर्गीयांसाठी मोठा लढा दिला आहे. त्यांना आरक्षण मिळवून देण्यात खारीचा वाटा त्यांनी उचलला.राज्यात त्यांना मानणारा एक वर्ग असून ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी भुजबळांच्या सोबत सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!